News Flash

देशाचा नकाशाच बदलला : राष्ट्रवादी काँग्रेसकडून शुभेच्छा देताना मोठी चूक

राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या छायाचित्रामध्ये देशाचा चुकीचा नकाशा वापरण्यात आला

रविवारी देशभरात ७१ वा प्रजास्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. खेळाडू, कलाकार, राजकीय नेते, पक्ष आणि विविध मान्यवरांनी देशवासीयांना सोशल मीडियावरून प्रजास्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, प्रजास्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून चूक झाल्याचं समोर आलं आहे.

प्रजास्ताक दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून फेसबुक, ट्विटरवर आणि इतर सोशल मीडियावरून देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. मात्र, शुभेच्छा देताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या छायाचित्रामध्ये देशाचा चुकीचा नकाशा वापरण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून देशाच्या अधिकृत नकाशा ऐवजी चुकीचा नकाशा प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये जम्मू काश्मीर आणि लडाखची सीमारेषा चुकली असून, पाकव्याप्त काश्मीर तसेच अक्साई चीन हे भाग दाखवण्यात आले नाहीत.

 

 

 

 

राष्ट्रवादीनं प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना भारताचा नकाशा पोस्ट केला आहे. ज्यात खांद्यावर तिरंगा घेऊन साहसी कौशल्य दाखवणाऱ्या जवानांचा फोटो आहे. लोकशाहीचा उद्घोष करणारे भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो ! सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! असं कॅप्शन देण्यात आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसनं चुकीचा नकाशा पोस्ट केल्याचं समजल्यानंतर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

 

 

त्वरित चुकीचा नकाशा हटवावा असे काही नेटकऱ्यांनी म्हटलेय तर एकानं थेट तक्रार दाखल करायचं का? असंही म्हटलेय. अन्य एका नेटकऱ्यानं लवकरात लवकर माफी मागावी असं म्हटलेय.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2020 9:55 am

Web Title: republic day 2020 ncp post wrong map publish of india nck 90
टॅग : Ncp,Sharad Pawar
Next Stories
1 क्या है *** ! कॅमेरासमोर मार्टीन गप्टीलने घेतली चहलची फिरकी
2 वाघोबाला पाहण्यासाठी ‘क्रिकेटचा देव’ ताडोबाच्या जंगलात
3 वायरशिवाय चार्ज होणार OnePlus 8 Pro !
Just Now!
X