17 December 2017

News Flash

Viral Video : वर्ग झाला ‘डान्स फ्लोअर’; विद्यार्थ्यांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल

वर्गातले डान्सिंग स्टार

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 3, 2017 10:58 AM

युट्युबवर आतापर्यंत ४८ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हडिओ पाहिला आहे.

आपल्या येथे टॅलेंटची कमी नाही, पण योग्य ती संधी आणि व्यासपीठ उपलब्ध नसल्याने अशा लोकांना कधीच प्रसिद्धी अनुभवता येत नाही. पण सुदैवाने आपल्याकडे सोशल मीडियाचा प्रभाव आणि व्याप्ती एवढी आहे, त्यामुळे सामान्यांसाठी मोठं व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. तेव्हा एखाद्या व्यक्तीचे कलागुण आवडले की त्या व्यक्तीला सोशल मीडियावर अक्षरश: डोक्यावर उचलून धरलं जातं. अशी कितीतरी उदाहरणं आहेत ज्यांनी आपल्या कलागुणांनी कोट्यवधी लोकांची मनं जिंकून घेतली आणि सोशल मीडियासारख्या मोठ्या व्यासपीठामुळे त्यांना रातोरात प्रसिद्धी मिळाली.

Viral : ..म्हणून बॉसने कर्मचाऱ्याला चिकटपट्टी लावून भिंतीवर टांगले

आता या व्हिडिओमधल्या दोन विद्यार्थ्यांचंच घ्या ना! वर्गात दोघंही नृत्याचा सराव करत आहेत. त्यावेळी त्यांचा व्हिडिओ काढून कोणीतरी तो सोशल मीडियावर अपलोड केला. हा व्हिडिओ वर्षभरापूर्वीचा असला तरी पुन्हा एकदा तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन्ही विद्यार्थ्यांच्या नृत्यशैलीचं खूप कौतुक सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. युट्युबवर आतापर्यंत ४८ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

सौंदर्याने घात केला; अधिकाऱ्याने विमानतळावरच अडवले

First Published on October 3, 2017 10:58 am

Web Title: school student dance on dj songs video goes viral on social media