News Flash

Video : ‘तौडा कुत्ता’वर थिरकला भारताचा गब्बर, लोकेश राहुलला हसू आवरेना

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सध्या सोशल मीडियावर यशराज मुखाटे या तरुणाच्या साडा कुत्ता कुत्ता…तौडा कुत्ता टॉमी या गाण्याने धुमाकूळ घातला आहे. बिग बॉस च्या १४ व्या हंगामातील शेहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला या कलाकारांच्या संवादाला यशराज मुखाटेने आपला तडका लगावत नवीन गाण तयार केलं. सोशल मीडियावर या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

आतापर्यंत अनेक सेलिब्रेटींनी या गाण्यावर डान्स करत आपला व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. आता या गाण्यावर भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवननेही डान्स करत आपला व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial)

शिखरच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी चांगली पसंती दर्शवली असून शिखरचा संघातील सहकारी लोकेश राहुलला हा व्हिडीओ पाहून हसू आवरलं नाहीये.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे, टी-२० मालिका संपल्यानंतर शिखर धवन भारतात परतला आहे. ऑस्ट्रेलिया दौरा आटोपल्यानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध वन-डे, टी-२० आणि कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2020 4:04 pm

Web Title: shikhar dhawans hilarious dance moves leave kl rahul in splits psd 91
Next Stories
1 MP गजब है! नवीन रस्त्यावर म्हशीने टाकलं शेण, मालकाला ठोठावला 10 हजार रुपये दंड
2 Microsoft ने तब्बल 130 अब्ज डॉलर्समध्ये विकत घेतली Sony कंपनी? जाणून घ्या काय आहे सत्य?
3 नासाच्या स्थापनेपासून तीन हजार शत्रू सैनिकांना ताब्यात घेण्यापर्यंत… बायडेन यांच्या त्या Achievements मागील सत्य काय?
Just Now!
X