03 August 2020

News Flash

फोटोसाठी सोंडेवर बसलेल्या महिलेला हत्तीनं अशी शिकवली अद्दल, व्हिडीओ झाला व्हायरल

हत्तीच्या सोंडेवर चढून महिला बसली मात्र पुढे असं काही घडलं की जे पाहून काळजाचा ठोका चुकतो

वेगवेगळे इफेक्ट्स, वेगवेगळे पोझ, हटके जागा शोधून स्वत:चे फोटो काढणं कुणाला आवडत नाही. त्यासाठी इतरांपेक्षा वेगळं असं फोटोशूट करण्याचा विचार प्रत्येकजण करत असते. त्यासाठी काहीही करायची तयारी अनेकांची असते. हटके आणि वेगळा प्रयोग करताना अनेकांना त्याची किंमतही मोजावी लागते. सध्या असाच एका फोटोशूटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फोटोशूटचा हटके प्रयोग त्या महिलेच्या जिवावर बेतला म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी या महिलेच्या फोटोशूटचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओत स्पष्ट दिसतेय की, एक महिला हत्तीच्या सोंडेवर बसून फोटोशूट करत आहे. पण या महिलेला हत्तीच्या सोंडेवर बसून फोटो काढण्याचा शौक चांगलाच महागात पडला. कारण हत्तीनं या महिलेला अगदी फुटबॉलसारखं फेकून दिलं आहे. त्या महिलेचं नशीब चांगलं होतं की हत्तीनं महिलेला पाण्यात फेकलं नाहीतर त्या महिलाचा जीव गेला असता.

सुशांत नंदा यांनी व्हिडीओ पोस्ट करताना भन्नाट असं कॅप्शनही दिलं आहे. या व्हिडीओमध्ये सगळ्यात सुंदर काय आहे महिला, हत्ती की घडलेला प्रसंग? असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. या मजेशीर फोटोशूटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओला आतापर्यंत दहा हजारांपेक्षा जास्त जणांनी पाहिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 9:26 am

Web Title: susanta nanda ifs viral video elephant women photoshoot nck 90
Next Stories
1 घर कब आओगे! जवानांना निरोप देताना कुटुंबीयांच्या डोळ्यात अश्रुंचा पूर; पुण्यातील Video Viral
2 हॉरर, विनाश, एलियन्स या विषयांवरील चित्रपट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, संशोधक म्हणतात…
3 गायीनं श्वानाच्या पिलांना केलं स्तनपान; व्हायरल व्हिडीओनं जिंकली मनं
Just Now!
X