जोडप्याला मूल होणं हा त्यांच्या आयुष्यातला एक फार मोठा क्षण असतो!

हे वरचं वाक्य मूल नसणारी अाणि असणारी जोडपी वेगवेगळ्या स्वरात म्हणतात!

बाळ होणं ही गोष्ट अतिशय आनंदाची असतेच पण त्या नव्या आईबाबांचं जग मुलाचा जन्म झाल्यावर उलटंपालटं होतं. मग ते रात्री २ वाजता बाळाने रडून घातलेला गोंधळ असेल का थिएटरमध्ये बाळाला घेऊन जाताना येणारी बंधनं असोत. बाळाची काळजी घेणं ही त्या जोडप्याची एक गोड डोकेदुखी होऊन जाते. मूल झाल्यावर या पालकांच्या सोशल लाईफवरसुध्दा जाम मर्यादा येतात. घरात पाहुणे आले तरी त्यांच्याशी नीटपण बोलता येत नाही कारण जरा गप्पा मारायला जावं तर बाळाने रडून गोंधळ घातलेला असतो. बाळाला त्याच्या खोलीत झोपवून बाहेर जायला निघालं तरी त्या बाळाला बरोब्बर कळतं आणि ते रडायला सुरूवात करतं.

याच सगळ्याच्या निमित्ताने आता एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

याच सगळ्याशी संबंधित असलेला एक व्हिडिओ जाम व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये दिसत असलेली आई तिच्या बाळाला झोपवून झोपमोड होऊ नये म्हणून चक्क सरपटत खोलीतून बाहेर पडतेय. पाहा

सौजन्य- फेसबुक

कोणालाही कळणार नाही अशा सफाईने, एवढ्या शांतपणे लष्करातले सैनिकही पुढे जात नसतील!

वाचा- ७ महिन्यांची गरोदर असतानाही ती ३ दिवस राबली!

हा व्हिडिओ आहे साऊथ आफ्रिकेतला आणि या महिलेचं नाव आह कॅरिन माॅरिस. कॅरिनच्या घरी पाहुणे आले होते आणि त्यांचं स्वागत करण्यामध्ये माॅरिस गुंतली होती. पण तिचा १५ महिन्यांच्या मुलगा सारखा रडारड करत होता. बाहेरच्या खोलीतला पाहुण्यांचा आवाज एेकून त्याला सारखं त्याच्या बिछान्यातून उठून बाहेर यावंसं वाटत होतं. आणि जर बिछान्यात राहायचं असेल तर आपल्या आईने आपल्या जवळ बसलं पाहिजे असा त्याचा हट्ट होता. तीन-चारदा प्रयत्न करूनही कॅरिनचं बाळ न झोपल्याने कॅरिनने शेवटी त्याच्या खोलीत बसकण मारली

आता आपली आई आपल्यासोबत असणार या कल्पनेने खुशीत येत बाळाने झोपायची तयारी केली. पण कॅरिनने त्याचा डोळा चुकवत खोलीबाहेर जायचा प्रयत्न केला की लगेच त्याचा धिंगाणा सुरू व्हायचा

शेवटी बाळ झोपल्यावर खोलीतून बाहेर जाताना त्याच्या नजरेला आपण पडू नये यासाठी कॅरिन चक्क सरपटत बाहेर गेली. तिचा हा डाव यशस्वी ठरला आणि बाळाला व्यवस्थित गाढ झोप लागली.

आपलं बाळ त्याच्या खोलीत सुरक्षित आहे की नाही यावर नजर ठेवण्यासाठी कॅरिन आणि तिच्या पतीने बाळाच्या खोलीत सीसीटीव्ही कॅमेरा बसवला होता. या कॅमेऱ्यामध्ये ही मजेदार घटना कैद झाली आहे.

आईच ती ! बाळाला शांत झोप मिळावी आणि त्याचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून काहीही करायला तयार होईल!