दक्षिण कोरिया आणि जपान या दोन देशांच्या वादात असलेल्या बेटावर ८१ वर्षांच्या आजी २८ वर्षांपासून राहत आहेत. दोन देशांमधील वादग्रस्त असलेल्या दोकोदो बेटावर मागील २५० वर्षांपासून मानवी वावर बंद करण्यात आला आहे. मात्र, या रिकाम्या बेटावर किम सिन-योल या आजीबाई गेले २८ वर्षे राहात आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांत या आजीची चांगलीच चर्चा सुरू आहे. या आजीबाईंचे नाव किम सिन-योल असे आहे.

अनेक अडचणी आणि संघर्षाचा समना करतही ही आजी गेली अनेक वर्षे या बेटावर एकटीच राहात आहे. तेही नागरिक म्हणून. दोकोदो बेटावर किम सिन-योल या आजी एकमेव नागरिक आहेत. अनेकांनी आग्रह करुनही ही आजीबाई हे बेट सोडायला तयार नाही हे विशेष. किम सिन-योल ही आजी १९९१ मध्ये आपल्या पतीसोबत पहिल्यांदा या बेटावर आली. गेल्याच वर्षी तिच्या पतीचे निधन झाले. पतीच्या निधनानंतरही ती या बेटाबाहेरच्या लोकवस्तीतर परतली नाही.

दोकोदो हे बेट नैसर्गिक वायू आणि खनिजांनी भरले असले तरीही जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींचा प्रचंड आभाव असल्यामुळे इथे राहणे या जोडप्यासाठी होते. खराब वातावरणामुळे या बेटाचा नजीकच्या लोकवस्तीशी (शहर) संपर्क अनेक महिन्यांसाठी आजही तूटतो.

काय आहे वाद –
दोकोदो या बेटावर दक्षिण कोरिया आणि जपान हे दोन्ही देश हक्क सांगत आहेत. दक्षिण कोरियाचा दावा असा की, १७ व्या शतकापासून हे बेट त्यांचे अभिन्न अंग आहे. तर, जपानही असाच दावा करत असून, हे बेट आपले असल्याचे सांगते.