छत्तीसगडमधील रायपूरमधील सिटी सेंटर मॉलमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एस्केलेटरवर चढत असताना एक वर्षाचा चिमुकला वडिलांच्या कुशीतून निसटला आणि थेट ४० फूट खाली कोसळला. या हृदयद्रावक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे, पण रुग्णालयात उपचारादरम्यान चिमुकल्याचा मृत्यू झाला. मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर एस्केलेटरवरून निरागस बाळ थेट जमिनीवर कोसळले. या घटनेचा व्हिडीओ बघून तुमच्याही अंगावर काटा येईल.

मॉलमधील एस्केलेटरवर वडील लहान मुलाला घेऊन चढताना दिसतायत, पण यावेळी अचानक त्यांच्या हातून ते मूल निसटते आणि थेट जाऊन जमिनीवर कोसळल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. दुसऱ्या मुलाचा हात पकडण्याच्या प्रयत्नात त्यांच्या हातून ते निरागस मूल निसटते आणि सुमारे ४० फूट खाली पडते. ही घटना मंगळवारी रात्री घडली.

Florida woman’s pet dog scares off alligator Nail-biting video is viral
“क्या मगरमच्छ बनेगा रे तू!” कुत्र्याला पाहून मगरीने ठोकली धूम, पळत जाऊन तळ्यात मारली उडी! पाहा Viral Video
shares market, stock prices
तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?

पंढरी येथील सिटी सेंटर मॉलमध्ये तिसऱ्या मजल्यावरून चौथ्या मजल्यावर जात असताना वडील एस्केलेटरवर चढत होते. यावेळी त्यांच्याबरोबर आणखी एक सहा वर्षांचा मुलगाही होता. तोही वडिलांबरोबर एस्केलेटरवर चढण्याचा प्रयत्न करत होता, त्यालाच पकडण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांच्या कुशीत असलेले मूल निसटते आणि थेट खाली कोसळते.

बाळाला गंभीर अवस्थेत तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेचा मोठा धसका घेतल्याने मुलाची आई बेशुद्ध झाली. घटनेनंतर देवेंद्रनगर पोलिसांचे पथक मॉलमध्ये पोहोचले आणि घटनास्थळाचा तपास सुरू केला. पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास राजन कुमार हे त्यांचा एक वर्षांचा मुलगा राजवीर आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह मॉलमध्ये आले होते. तिसऱ्या मजल्यावर खरेदी केल्यानंतर ते एस्केलेटरने चौथ्या मजल्यावर जात होता. यावेळी राजवीर त्यांच्या कडेवर होता व त्यांचा सहा वर्षांचा दुसरा मुलगाही त्यांच्याबरोबर एस्केलेटरवरून जात होता. त्याला पकडण्याच्या प्रयत्नात राजवीर निसटून थेट ४० फूट खाली पडला.

काही वेळातच मॉल झाला रिकामा

मूल पडल्यानंतर तेथे उपस्थित दुकानदार आणि खरेदीसाठी आलेल्या लोकांना मोठा धक्का बसला. प्रत्येक जण मुलाच्या आरोग्यासाठी प्रार्थना करू लागले. मात्र, काही वेळाने मुलाच्या मृत्यूचे वृत्त समजताच दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला पाहून सर्वांनाच धक्का बसला.