तुम्हाला रोज जिममध्ये जाण्याचा कंटाळा येतो का? तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे पण त्यासाठी काहीतरी प्रेरणा हवी आहे का? मग, या शंभरी पार आजींचा जिममधील व्हिडिओ एकदा पाहा. तुम्हाला नक्कीच भरपूर प्रेरणा मिळेल. कॅलिफोर्नियातील कॅमेरिलो येथील रहिवासी असलेल्या १०३ वर्षीय टेरेसा मूर या आठवड्यातून किमान तीन ते चार वेळा त्यांच्या स्थानिक फिटनेस सेंटरला भेट देतात तेही पूर्ण मेकअप करून आणि त्यांना शोभेल अशा दागिन्यांसह. ही माहिती फॉक्स ११ लॉस, एंजेलिसच्या अहवालामध्ये प्रसिद्ध झाली आहे. त्यांची मुलगी शीला मूर सांगतात की, जीम ही आईसाठी तिची ‘आनंदी जागा’ आहे.

१०३ वर्षीय आजी रोज जातायेत जिममध्ये

टेरेसा यांचा जन्म इटलीमध्ये झाला आणि १९४६ रोजी आपल्या दिवंगत लष्करी पतीसोबत लग्न केले. “जेव्हा तिने इटली सोडले तेव्हा ती भटकंतीचे जीवन जगत होती आणि मला वाटते की, कुतूहल हा एक मोठा प्रेरणादायी घटक होता,” असे शीला यांनी फॉक्स ११ लॉस, एंजेलिससोबत बोलताना सांगितले.

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

आपल्या आईच्या जिमबद्दलच्या प्रेमाबद्दल बोलताना शीला सांगतात की, “तिथेच ती तिच्या मैत्रिणींना भेटते. मला वाटते, माझी आई एक जिज्ञासू व्यक्ती आहे.”

दीर्घ आणि आनंदी जीवन कसे जगावे याबद्दल, टेरेसा सल्ला देतात की, “आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. चांगल्या गोष्टींचा विचार करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक गोष्ट सुंदर आहे असा विचार करा, सुंदर गोष्टींचा विचार करा.

वृद्धांसाठी व्यायाम चांगला आहे का?

वृद्ध लोकांसाठी देखील शारीरिक हालचाली किंवा व्यायामाचे बरेच फायदे आहेत. व्यायाम सुरू करण्यास आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय होण्यास कधीही उशीर होत नाही. याबाबत इंडियन एक्सप्रेससोबत संवाद साधताना हैदराबादचे यशोदा हॉस्पिटल्सचे फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट सल्लागार डॉ. हरि किशन बुरुगु सांगतात की, “ज्या व्यक्तींनी बसून काम केले आहे त्यांनी ८० च्या वयात व्यायाम करण्यास सुरुवात केल्यास त्यांनाही इतर बसून राहणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत अधिक फायदा होऊ शकतो.” अत्यंत दुर्बल वृद्ध प्रौढांमध्ये देखील व्यायामामुळे तंदुरुस्ती आणि सामर्थ्यामध्ये सुधारणा झाल्याचे नोंदवले गेले आहे.”

७२ टक्के भारतीय आनंदी असताना करतात ही चूक, काय सांगतो अहवाल जाणून घ्या

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल, यूएसए शिफारस करतो

  1. आठवड्यातून किमान १५० मिनिटे मध्यम तीव्रतेची हालचाल करावी. जसे की वेगाने चालणे.
  2. आठवड्यातून किमान २ दिवस स्नायूंना बळकटी देणारे व्यायाम करावे.
  3. संतुलन सुधारण्यासाठी व्यायाम करावे. जसे की एका पायावर उभे राहणे.

“शिफारस केलेल्या व्यायामाची पातळी गाठणे हे त्यांचे लक्ष्य असणे आवश्यक आहे पण त्यांच्या क्षमतेनुसार शक्य तितके सक्रिय असणे आवश्यक आहे,” असे डॉ बुरुगु सांगतात.

वृद्धांसाठी व्यायामाची पद्धत कशी तयार करावी?

डॉ बुरुगु सांगतात की, व्यायामाचे मूल्यांकन आणि स्क्रिनिंग फॉर यू (EASY) साधन वृद्धांसाठी फिटनेस नियम तयार करण्यासाठी वापरले जाऊ शकते. “EASY ही वृद्ध प्रौढांसाठी सहा- घटकांची रुग्णांसाठी तयार केलेली प्रश्नावली आहे जी आरोग्यविषयक समस्या आणि चिंता तपासण्यासाठी वापरली जाऊ शकते आणि विविध आरोग्य स्थिती आणि परिस्थितींसाठी अनुकूल शारीरिक हालचाली प्रोग्राम विकसित करण्यासाठी वापरली जाऊ शकते,” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

काही वृद्ध लोकांच्या पडण्याच्या धोक्यासंबधीत मर्यादा, अंतर्निहित हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी स्थितीनुसार व्यायाम सहनशीलता मर्यादित करते का, यावर ही प्रश्नावली लक्ष केंद्रित करते.

एक पांढरा केस उपटल्याने अधिक केस पांढरे होतात का? काय सांगतात तज्ज्ञ, जाणून घ्या

न्युरोलॉजिकल आणि हृदयविकार असलेल्या वृद्धांनी डॉक्टरांशी चर्चा करावी
“न्युरोलॉजिकल आणि हृदयविकार असलेल्या वृद्ध लोकांनी त्यांच्या व्यायामाच्या पद्धतीबद्दल त्यांच्या उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा करणे चांगले आहे. शारीरिक हालचालींच्या फायद्यांमध्ये वाढीव लवचिकता, गतिशीलता, फिटनेस यांचा समावेश होतो आणि त्यांना शारीरिक स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यास मदत होते,” डॉ बुरुगु यांनी निष्कर्ष काढला.