तान्ही मुले एकदा रांगू लागली किंवा त्यांच्या हातापायांमध्ये जोर यायला लागला की दिसतील त्या वस्तू आपल्या तोंडात टाकतात. पालकांचे लक्ष नसताना रांगत घरातील लहान-लहान कोपऱ्यांमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. सध्या अशाच एका १८ महिन्यांच्या बाळाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका तान्ह्या बाळाच्या डोक्यामध्ये एक मोठे पातेले अडकले असून, अग्निशमन कर्मचाऱ्यांनी अत्यंत कुशलतेने ते काढल्याचा हा व्हिडीओ आहे.

एक्स या सोशल मीडिया माध्यमावरून Behindtalkies नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर झाला आहे. चेन्नईच्या पोरूर भागात ही घटना घडली होती. लेटेस्टलीच्या एका लेखानुसार, २४ मार्च २०२४ रोजी अग्निशमन कर्मचाऱ्यांना एक फोन आला होता. त्यावरून त्यांना १८ महिन्यांच्या बाळाच्या डोक्यामध्ये पातेले अडकल्याचे समजले. सुरुवातीला त्यांनी बाळाच्या डोक्यावरील पातेले कापण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यात त्यांना यश मिळाले नाही.

हेही वाचा : Fact check : गुजरातमध्ये बांधलाय ७२ मीटर उंचीचा ब्रिज? Viral होणारा व्हिडीओ नेमका कुठला?

नंतरअग्निशमन कर्मचाऱ्यांनी बाळाच्या डोक्याला तेल लावले, विविध उपाय करून पहिले, परंतु याने पातेलं काढणे सोपे होण्याऐवजी बाळाला त्रास अधिक होऊ लागला. शेवटी अर्ध्या तासाच्या अथक परिश्रमानंतर अग्निशमन कर्मचाऱ्यांनी पातेल्याची कोर एका मोठ्या कात्रीच्या साहाय्याने कापून शेवटी त्यामधून त्या चिमुकल्या बाळाचे डोके सोडवण्यात यशस्वी झाले. या सर्व घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान त्या चिमुकल्या बाळाला त्रास होऊन, ते रडून रडून प्रचंड हैराण झाल्याचेसुद्धा आपण पाहू शकतो आणि ऐकू शकतो. व्हायरल होणारा हा व्हिडीओ अनेक चॅनेल्स आणि पेजने शेअर केला असून, याला हजारो व्ह्यूज आणि प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.