आपल्या आजूबाजूला दररोज रिक्षाने प्रवास करणारी अनेक माणसे असतात. एका रिक्षामध्ये फक्त तीन प्रवासी बसवण्याचा नियम सरकारने लागू केला आहे. तरीही काही चालक चार जणांना बसवून घेतात. रिक्षामध्ये साधारणपणे तीन ते चार जणच बसू शकतात. यापेक्षा जास्त माणसं बसवण्याची क्षमता रिक्षामध्ये नसते. पण हा भारत देश आहे. इथे सर्व काही शक्य आहे. याच संबंधित एक रिक्षाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या रिक्षेत ३ किंवा ४ नव्हे तर तब्बल १९ प्रवासी बसले आहेत. तुम्हीही हे ऐकून थक्क झालात ना? पण होय, हे खरंय. एक रिक्षा चालक तब्बल १९ प्रवाशांना घेऊन रिक्षा चालवत होता. पण रिक्षामधील इतक्या छोट्या जागेत एवढे प्रवासी बसले तरी कसे?

रिक्षेत १९ माणसं बसली कशी?

मीडिया रिपोर्टनुसार हा व्हिडीओ मध्यप्रदेश मधील असल्याचे समजत आहे. एक रिक्षा चालक १९ प्रवाशांना घेऊन रस्त्यावरून जात होता. तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की कशाप्रकारे रिक्षेमध्ये माणसं बसली आहेत. तितक्यात बाजूने जाणाऱ्या पोलिसांनी या रिक्षेला बघितलं आणि तेही पाहून चक्रावले. त्यांनी पुढे जाऊन रिक्षाला अडवलं आणि रिक्षामधील प्रवाशांना बाहेर काढलं. रिक्षेतून तब्बल १९ प्रवासी बाहेर निघाले. यामध्ये काही माणसं एकमेकांच्या मांड्यावर बसली होती. तर काही जण रिक्षाचालकाच्या बाजूला बसली होती. काही जण तर थेट रिक्षाच्या पाठीमागे उभी होती. या प्रवाशांमध्ये महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश होता. हा प्रकार पाहून पोलीसही हैराण झाले.

रिक्षेतून १९ प्रवासी बाहेर निघताच पोलीसही चक्रावले..

( हे ही वाचा: Video: AC लोकलचे दरवाजे न उघडल्याने प्रवासी थेट विरारला पोहोचले; संतप्त प्रवाशांनी ड्रायव्हरला केबिनमध्ये बंद केलं अन्..)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हायरल व्हिडीओ @bhagwat__pandey या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ अनेकजणांनी पाहिला असून शेकडो लोकांनी लाईकही केला आहे. तसंच अनेकजण यावर मजेशीर कंमेंट देखील करत आहेत. खरं तर ३ पेक्षा जास्त प्रवासी घेऊन रिक्षाने प्रवास करणे चुकीचे आहे. यामध्ये मोठा अपघात होण्याची किंवा रिक्षा पलटण्याची शक्यता असते. तुम्हाला याबाबत काय वाटते ते आम्हाला नक्की कळवा..