Viral Video : पॅराग्लायडिंग हा एक साहसी क्रिडा प्रकार आहे. पॅराग्लायडिंगच्या मदतीने व्यक्ती हवेच्या झोतावर स्वार होऊन उड्डाण करतो. अनेकांना समुद्राच्या वर पॅराग्लायडिंग करायला आवडते. खाली समुद्र आणि वर आकाशात उड्डाण करण्याचा आनंद अनुभवाचा असतो. सोशल मीडियावर पॅराग्लायडिंग
करतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. अनेक जण त्यांचा अनुभव सोशल मीडियावर सांगतात. सध्या गोव्यातील पॅराग्लायडिंगचा एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे पण हा व्हिडीओ पाहून यापुढे कोणीही पॅराग्लायडिंग करताना दहा वेळा विचार करेन. गोव्यात पॅराग्लायडिंग करताना एका तरुणीचा मृत्यू झाला. पॅराग्लायडिंग करतानाचा तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. (27 year old Punekar woman died in in paragliding accident in goa as paraglider crash video goes viral)

व्हायरल व्हिडीओमध्ये काय दिसत आहे?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक पॅराग्लायडिंग चालक आणि एक तरुणी पॅराग्लायडिंग करताना दिसतात. अचानक त्यांच्या पॅराशूटची दोरी तुटते आणि त्यांचा तोल जातो आणि ते खाली पडतात. हा व्हिडीओ पाहून कोणालाही धक्का बसेल.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

humnagpurkar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “
गोव्यात पॅराग्लायडिंग करताना २७ वर्षीय शिवानी ईश्वर डबले हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण शहराला मोठा धक्का बसला आहे. दोरी तुटणे हे अपघाताचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. शिवानीच्या कुटुंबावर सध्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातामुळे पॅराग्लायडिंगसारख्या साहसी खेळात सुरक्षा उपायांच्या अभावावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. गोवा पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक नियमांची गरज आहे. आम्ही या व्हिडिओची पुष्टी करत नाही”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्दैवी घटना शनिवार, १८ जानेवारी २०२५ आहे शिवानी तिच्या पतीसोबत हनिमूनसाठी गोव्यात आली होती. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे पॅराग्लायडिंग करताना सुरक्षेच्या अभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते आहे.