Shocking Video Viral : काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. अनेक भागांत रस्ते पाण्याखाली गेलेत, वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडलीत, घरांची छपरे उडून गेली आहेत, रस्ते खचण्यासह सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेलाही फटका बसला आहे. या सर्व भीती निर्माण करणाऱ्या परिस्थितीमुळे लोकांची त्रेधातिरपीट उडाल्याचे दिसतेय. समुद्रकिनारी अजस्र लाटा उसळताना दिसतायत, अनेक धबधबे प्रवाहित होऊन कोसळतायत. त्यामुळे लोकांनी अशा परिस्थतीत समुद्र किंवा धबधब्याच्या ठिकाणी जाऊ नका, असे आवाहन केले जातेय; पण तरीही काही अतिउत्साही लोक जीव धोक्यात घातलाना दिसतात. सध्या सोशल तीन तरुणांचा एक भयानक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात जीवापेक्षा त्यांना मासे किती महत्त्वाचे आहेत ते दिसतेय.

या व्हिडीओत तीन तरुण धबधब्याच्या मध्यभागी असलेल्या एका मोठ्या खडकावर उभे राहून मासेमारी करताना दिसत आहेत. धबधब्यात पाण्याचा प्रवाह इतका जास्त आहे की, ज्यात चुकूनही कोण पडले, तर माणसाचा मृत्यू होऊ शकतो; पण ते तीन तरुण मात्र जीवाची पर्वा न करता, त्या खडकावर उभे राहून आरामात मासेमारी करतायत. हे दृश्य पाहताना तुम्हालाही भीती वाटेल.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे एक मोठा धबधबा प्रवाहित होऊन कोसळतोय. धबधब्याच्या वरून कोसळणाऱ्या पाण्याचा ओघ इतका जास्त आहे की, पाणी पूर्णपणे फेसाळल्याचे दिसतेय. पण, याच रौद्र रूप दाखविणाऱ्या धबधब्याच्या मध्यभागी असलेल्या खडकावर उभे राहून काही तरुण मासेमारी करताना दिसत आहेत. अशा प्रकारे मासेमारी करण्यात ‘थ्रिल’ असू शकते; पण त्यामध्ये प्राणही संकटात येऊ शकतात; पण त्याची या तरुणांना कसलीच पर्वा दिसत नाही.

हा धडकी भरविणारा व्हिडिओ @PicturesFoIder नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. या तरुणांचा मूर्खपणा पाहून अनेकांना धक्का बसला आहे. या दृश्यातील त्या तरुणांचे जीवघेणे कृत्य पाहून काही लोक म्हणतायत की, जीवन मौल्यवान आहे, ते साहस करण्याच्या नादात धोक्यात घालू नका. एका युजरने लिहिले, “या लोकांना जीव महत्त्वाचा नाही का? इतक्या धोकादायक ठिकाणी मासेमारी करायला जाण्याची काय गरज होती?” दुसऱ्याने उपहासाने लिहिले, “त्यांना मासे पकडण्यापेक्षा जीव धोक्यात घालण्यात जास्त रस आहे, असे दिसतेय.”