६८ वर्षांची वृद्ध महिला आपल्या कुटुंबासह केदारनाथ यात्रेला निघाली. आपल्या कुटुंबासह वेळ घालविण्यासाठी आणि पवित्र स्थळाच्या सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी ती अत्यंत उत्साही आणि आनंदी होती. पण सर्वकाही क्षणर्धात बदलले, जेव्हा गर्दीमध्ये तिची तिच्या कुटुंबापासून चुकामूक झाली. अनोळखी ठिकाण, त्यात धड त्यांची भाषादेखील तिला बोलता येईना ना, ना धड तिची भाषा तिथे कोणाला समजेना. कुटुंबापासून विलग होऊन एकटी मागे राहिल्यामुळे ती अक्षरश: रडकुंडीला आली होती. तिला काय करावे हे समेजना, पण अखेर तंत्रज्ञानाच्या मदतीने ती आपल्या कुटुंबापर्यंत पोहचली. कसे ते जाणून घ्या.

ही महिला मूळची आंध्र प्रदेशची होती आणि तिला तेलुगू भाषेची चांगली जाण होती, पण ती हिंदी किंवा इंग्रजी या दोन्ही भाषांत संवाद साधू शकत नव्हती. जिवाचा आटापिटा करत ती तिच्या आसपासच्या लोकांकडे मदत मागत होती, पण कोणालाही ती काय बोलतेय समजत नव्हते. ती महिला फार वैतागली होती. पोलिसांना ही महिला सापडली तेव्हा त्यांनाही तिच्यासोबत संवाद साधता येईना. अखेर गुगल ट्रान्सलेटरचा वापर करून अनोळखी लोकांशी ही महिला संवाद साधू शकली, ज्यामुळे तिला कुटुंबाशी संपर्क साधता आला.

खराब हवामानामुळे कुटुंबापासून विभक्त झाली ६८ वर्षीय महिला

पीटीआयच्या वृत्तानुसार, केदारनाथहून परत येत असताना खराब हवामानामुळे या महिलेची तिच्या कुटुंबापासून चुकामूक झाली. ज्या पोलिसांना ती सापडली त्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, गौरीकुंड शटल पार्किंग लॉटमध्ये ती महिला अस्वस्थ मनःस्थितीत होती. या महिलेला पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधता येत नव्हता.

जबरस्त फीचर्सने रंगलेल्या ‘या’ कारला पाहून अमिताभ बच्चन झाले नि:शब्द , म्हणाले, “माझ्या मुखातून…

आंध्र प्रदेशच्या या महिलेला तेलुगूशिवाय इतर कोणतीच भाषा येत नव्हती

“आम्ही तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्हाला समजले की, ती हिंदी किंवा इंग्रजीत संवाद साधू शकत नाही. ती फक्त तेलुगू बोलत होती,” असे उपनिरीक्षक रमेश चंद्र बेलवाल यांनी पीटीआयला सांगितले. “हावभावांद्वारे, आम्ही तिला आश्वासन दिले की, ती तिच्या कुटुंबाला पुन्हा भेटेल. आम्ही तिला थोडे खायला देऊन शांत केले आणि ती आम्हाला जे काही सांगण्याचा प्रयत्न करत होती त्याचा अर्थ लावण्यासाठी गुगल ट्रान्सलेटरची मदत घेतली,” असे त्यांनी पुढे सांगितले.

गुगल ट्रान्सलेटरच्या मदतीने पोलिसांनी साधला महिलेशी संवाद

त्यानंतर पोलिसांनी महिलेने तेलुगूमध्ये सांगितलेला नंबर डायल केला आणि असे आढळून आले की, तिचे कुटुंब सोनप्रयागमध्ये आहे. तिचे कुटुंब गौरीकुंडपासून जवळजवळ आठ किलोमीटर दूर होते, जिथे वृद्ध महिला एकटी मागे राहिली होती. गुगल ट्रान्सलेटरच्या माध्यमातून पोलिसांना महिलेच्या कुटुंबाशी संवाद साधता आला, जे ६८ वर्षीय महिलेचा शोध घेत होते.

हेही वाचा- तुम्ही कधी कालका-शिमला रेल्वेमार्गावर प्रवास केला आहे का? नसेल तर एकदा नक्की जा, मनमोहक दृश्याचा घ्या आनंद

गुगल ट्रान्सलेटरमुळे महिलेच्या कुटुंबासोबत साधता आला संपर्क

महिलेच्या कुटुंबाचा ठावठिकाणा कळल्यानंतर लगेचच, पोलिसांनी एका वाहनाची व्यवस्था केली आणि महिलेला तिच्या कुटुंबाकडे पुन्हा सोनप्रयागला नेण्यात आले, असे अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संवाद साधण्यासाठी गुगल ट्रान्सलेटर कसे वापरावे

विशेष म्हणजे, गुगल ट्रान्सलेटर १०० पेक्षा जास्त भाषांमधील मजकूर भाषांतरित करू शकतो. तुम्ही गुगल ट्रान्सलेटर वेबसाइट किंवा अ‍ॅपमध्ये मजकूर टाइप करू शकता किंवा लिहू शकता. गुगल ट्रान्सलेटर, तुमच्या आवडीच्या भाषेत मजकूर भाषांतरित करेल. किंवा तुमची भाषा न समजणार्‍या व्यक्तीशी तुम्हाला काही संवाद साधायचा असेल तर, तुम्ही गुगल ट्रान्सलेटरच्या मायक्रोफोनमध्ये एक वाक्य बोलू शकता. गुगल ट्रान्सलेटर तुमच्या आवडीच्या भाषेत वाक्य भाषांतरित करेल. गुगल ट्रान्सलेटर अ‍ॅप Android आणि iOS दोन्ही उपकरणांसाठी उपलब्ध आहे.अ‍ॅप तुम्हाला मजकूर भाषांतरित करण्याची, एक वाक्य बोलण्याची, मजकुराचे छायाचित्र घेण्यास आणि रिअल टाइममध्ये संभाषणांचे भाषांतर करण्याची अनुमती देते.