प्रेमात आणि युद्धात सर्वकाही चालतं असं म्हणतात. आजवर आपण प्रेमाच्या अशा अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. प्रेमाच्या नादात लोकं आपल्या मर्यादा ओलांडतात. त्यांना आपल्या प्रेमापुढे काहीही दिसत नाही. अशीच एक घटना मध्यप्रदेशातील ग्वालियर जिल्ह्यातून समोर आली आहे. प्रेमाची ही गोष्ट एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. या जिल्ह्यातील एका ६७ वर्षाच्या महिलेला आपल्यापेक्षा ३९ वर्षांनी लहान व्यक्तीवर प्रेम झाले आहे. रामकाली आणि भोलू अशी या गोघांची नावे आहेत. आता या दोघांनी एकत्र राहण्यासाठी कोर्टाची पायरी चढण्याचा निर्णय घेतला आहे.

रामकली आणि भोलू सध्या लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असून त्यांना आता त्यांचे भावी आयुष्यही याच पद्धतीने घालवायचे आहे. यासाठी त्यांनी ग्वाल्हेर न्यायालयात नोटरी बनवली आहे. रामकली आणि भोलू यांनी सांगितले की दोघेही एकमेकांवर प्रेम करतात. यासाठी त्यांनी ग्वाल्हेर न्यायालयात नोटरी बनवली आहे. गेल्या ६ वर्षांपासून ते लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहत असून यापुढेही ते एकत्र राहू इच्छितात. दोघेही प्रौढ आहेत. लिव्ह-इन रिलेशनमध्ये असताना, भविष्यात कोणताही वाद होऊ नये आणि त्यांचे नाते पूर्वीपेक्षा अधिक दृढ व्हावे, यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

पोलिसांनाही ‘कच्चा बादाम’ गाण्याची क्रेझ; डान्स करतानाचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

वकील दिलीप अवस्थी यांनी सांगितले की, हे जोडपे मुरैना जिल्ह्यातील कैलारसचे रहिवासी आहेत. ६८ वर्षांची रामकली आणि २८ वर्षांचा भोलू एकमेकांवर प्रेम करतात आणि त्यांना एकमेकांसोबत राहायचे आहे पण लग्न करायचं नाही. लिव्ह इन रिलेशनमध्ये असताना कोणताही वाद होऊ नये, त्यामुळे दोघांचीही नोटरी झाली आहे. नोटरीसाठी त्यांनी ग्वाल्हेरच्या जिल्हा न्यायालयात लिव्ह इन रिलेशनमध्ये राहण्याची कागदपत्रे सादर केली आहेत.

Viral Video: पोलीस दिसताच दंड टाळण्यासाठी तरुणीने वाढवला स्कुटीचा वेग; त्यानंतर जे झालं ते पाहून हैराण व्हाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अ‍ॅडव्होकेट असोसिएशनचे सचिव अ‍ॅडव्होकेट दिलीप अवस्थी यांच्या मते, आपापसातील वाद टाळण्यासाठी जोडपी लिव्ह-इन रिलेशनची नोटरी तयार करतात. तथापि, अशा दस्तऐवजासाठी कोणतेही कायदेशीर औचित्य नाही. संपर्क कायदा फक्त इस्लाममध्ये वैध आहे. हा कायदा हिंदू विवाह कराराच्या श्रेणीत येत नाही. मात्र, ६८ वर्षीय रामकलीच्या २८ वर्षीय भोलूवरील प्रेमाची कहाणी सध्या चर्चेचा विषय बनली आहे.