Viral Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण डान्स करताना दिसतात. सध्या अशाच एका चिमुकलीचा डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही चिमुकली लावणी सादर करताना दिसत आहे. या चिमुकलीची लावणी पाहून कोणीही थक्क होईल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

चिमुकलीने सादर केली अप्रतिम लावणी

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक चिमुकली स्टेजवर लावणी सादर करताना दिसत आहे. तिने नऊवारी नेसली आहे. महाराष्ट्रीयन नऊवारी लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. तिच्या लावणी स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. ‘मी मदन मंजिरी सुबक ठेंगणी लखलखते सुंदरी’ या गाण्यावर ती लावणी नृत्य करताना दिसत आहे. ती इतकी सुंदर लावणी नृत्य सादर करते की तुमची तिच्यावरून एका क्षणासाठी नजर हटणार नाही. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

rajdancer2021 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “नेत्राचा लावणी पहिला पार्ट ला छान प्रतिसाद दिलात म्हणून हा दुसरा पार्ट लावणीचा कसा वाटला”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “काय एक्सप्रेशन आहेत बाप .. खूप छान” तर एका युजरने लिहिलेय, “आभार त्या आईवडिलांचे” आणखी एका युजरने लिहिलेय, ” मूर्ती लहान पण कीर्ती महान दीदीची ” अनेक युजर्सनी या चिमुकलीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोण आहे ही चिमुकली?

या चिमुकलीचे नाव नेत्रा शितोळे असून ती एक उत्तम डान्सर आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे राहणारी नेत्रा शितोळे खूप छान नृत्य करते. तिच्या नृत्यावर नेटकरी नेहमी कौतुकाचा वर्षाव करतात. सोशल मीडियावर सुद्धा नेत्राला हजारो लोक फॉलो करतात. ती तिचे डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. तिच्या बायोमध्ये दिलेल्या माहितीनुसार तिने झी मराठी ड्रामा ज्युनिअर मध्ये सहभाग घेतला होता. ती टॉप १६ मध्ये होती. तिने गोवा डान्स चॅम्पियनशिप सुद्धा जिंकलेली आहे.