Viral Video : महाराष्ट्राला गड किल्ल्यांचा फार मोठा इतिहास लाभला आहे. या गडकिल्ल्यांवर अनेक लोक भेट देतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याची आठवण काढतात. अनेक शिवप्रेमी सोशल मीडियावर गड किल्ल्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक अपंग व्यक्ती कुबड्या हातात घेऊन गड किल्ला चढताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. परिस्थिती काहीही असू द्या. प्रत्येक शिवप्रेमीच्या मनात महाराजांची ओढ कायम असते. हा व्हिडीओ पाहून कोणीही भारावून जाईल.

व्हायरल व्हिडीओ

हा व्हायरल व्हिडीओ रायगडावरील आहे. या व्हिडीओत तुम्हाला गडाच्या पायथ्याशी एक अपंग व्यक्ती रायगड चढताना दिसत आहे. या अपंग व्यक्तीच्या हातात कुबड्या आहे. व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. या व्हिडीओत रायगडावरील सुंदर परिसर दाखवला आहे. अनेक जण गड किल्ले चढावे लागतात, म्हणून जाणे टाळतात पण हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भारावून जाल. अनेकांना प्रेरणा देणाऱ्या या अपंग व्यक्तीचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. महाराजांची ओढ असेल तर परिस्थिती काहीही असली तर आपण आवडीने गड किल्ले चढतो, हे या व्हिडीओतून तुम्हाला दिसून येईल.

हेही वाचा : तुम्ही गाडीत पेट्रोलबरोबर पाणी तर भरत नाही ना! पाहा पेट्रोलपंपावरील घोटाळ्याचा धक्कादायक VIDEO

पाहा व्हिडीओ

amruta_thorat1 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “काहीजण कंटाळा करतात की गड किल्ले खूप उंच आहे, आपण कसे चढणार, चढू की नाही, मग हे उत्तम उदाहरण आहे… एकदा तरी आपल्या गड किल्ल्यांना भेट द्यायला पाहिजे”

हेही वाचा : Bhastrika Pranayama VIDEO : स्वत:ला उत्साही ठेवण्यासाठी चहा किंवा कॉफी घेताय? त्यापेक्षा नियमित करा भस्त्रिका प्राणायाम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “जो पर्यंत रायगडावर माझा राजा, तोवर ह्योच आमचा कैलास आणि हीच आमची अलकनंदा…शिवप्रभूंची समाधी”