सोशल मीडियावर दररोज एकापेक्षा एक गमतीशीर व्हिडीओ शेअर केले जातात. मात्र, यामध्ये काही व्हिडीओ गमतीशीर असतात मात्र ते पाहिल्यावर आपणाला आश्चर्याचा धक्का बसतो. तर काही व्हिडीओतील दृश्यांवर विश्वास ठेवणं कठीण जातं. सध्या अशाच एका ट्रकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ट्रकला पुढील बाजूची दोन चाके नसतानाही तो हायवेवर धावताना दिसत आहे.

हेही पाहा- Video: कोणतीही तोडफोड न करता चक्क दोरीने कार केली अनलॉक; नेटकरी म्हणाले “चोरीच्या आयडीया…”

भारतीय लोक जुगाड करण्यात खूप पटाईत आहेत, त्यांनी केलेली अनेक जुगाड आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत असतो. शिवाय नेटकऱ्यांना देखील असे वेगवेगळ्या जुगाडाचे व्हिडीओ पाहणं खूप आवडतं. सध्या अशाच एका जुगाडू ड्रायव्हरने ज्या पद्धतीचा ट्रक चालवला आहे ते पाहून नेटकऱ्यांना धक्काच बसला आहे.

हेही पाहा- Video: विद्यार्थ्याने पेपरमध्ये उत्तराऐवजी लिहिली चक्क अली जफरची गाणी; शिक्षक म्हणाले “आंधळा…”

कारण, इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये एक ट्रक हायवेवर धावताना दिसत आहे. मात्र, या ट्रकला पुढील बाजूची दोन चाके नसतानाही ट्रकचालक आरामात ट्रक चालवत असल्याचं पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. हा व्हिडीओ _fun_zone_91 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून आतापर्यंत ४ मिलियनहून अधिक वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे. तर या व्हिडीओवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Kartik Lakhotra (@kartik_deaf_2)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चाके नसलेला ट्रक फक्त भारतीय ट्रक ड्रायव्हरच चालवू शकतात असं एकाने लिहलं आहे. तर आणखी एका नेटकऱ्याने, “पण हा ट्रक कसा वळणार?” असा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारला आहे. तर एका वापरकर्त्याने खूप गमतीशीर कमेंट केली आहे, त्याने लिहलं आहे की, ‘एलॉन मस्क ड्रायव्हर काढून टाकण्याच्या मागे लागला आहे, इथे तर ड्रायव्हर चाके हटवायला लागलेत.’