Farmer Dance video viral: सोशल मीडियावर रोज अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही आपल्याला पोट धरून हसवणारे तर काही थक्क करणारे असतात, असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक आजोबा शेतात मनसोक्त डान्स करत असल्याचे दिसत आहे. त्यांचा उत्साह हा तरुणाईला लाजवेल असा आहे. उत्साहाला कशाचेच बंधन नसते, अगदी वयाचेही नाही याचाच प्रत्येय सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओतून येत आहे.

‘प्रेमाची लागली भन्नाट’ या गाण्यावर आजोबांनी चांगला डान्स केला आहे. त्या व्हिडीओमध्ये आजोबांची स्टेप्स आणि एनर्जी दोन्हीही दिसत आहेत. आजोबांचा डान्स पाहून बाजूला असलेल्या आजीही लाजत आहेत. एरवी सत्तरी ओलांडली की अनेकजण अंथरुणाला खिळतात. परंतु, डान्स करताना आजोबांच्या अंगात सळसळून उर्जा वाहताना दिसून येत आहे. पाऊस पडला म्हणून आजोबांना आनंद झाला, त्यामुळे आजोबा शेतातच नाचायला लागले आहे. असं कॅप्शनमध्ये लिहलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावरही स्मित हास्य येईल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: मुंबई विमानतळावर जोडप्याचा राडा; इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांना केली शिवीगाळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

shetkari_brand या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक तो पुढे सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आमचा शेतकरी राजा खुश तर सगळा देश खुश, यापेक्षा दुसरा आनंद कोणताच नाही.”