भाऊबीजनिमित्त सोशल मीडियावर बहिण भावाचे अनेक जुने-नवीन व्हिडीओ व्हायरल होत आहे. काही व्हिडीओ इतके मजेशीर आहे की पोट धरुन हसायला येईल. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भावंडे बहिणीच्या लग्नात भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. बहिणीला ‘कचरा’ म्हणत ‘गाडी वाला आया हे घर से कचरा निकाल’ गाण्यावर ते डान्स करत आहेत. हा मजेशीर व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. सध्या या व्हिडीओची जोरदार चर्चा सुरू आहे.

हा व्हायरल व्हिडीओ लग्नाच्या एका कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओमध्ये बहिणीच्या लग्नात तिचे भाऊ डान्स करताना दिसत आहेत. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की स्टेजवर नवरीचे भाऊ डान्स करत आहेत आणि नवरी स्टेजसमोर बसली आहे. पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की नवरीचे भाऊ ‘गाडी वाला आया हे घर से कचरा निकाल’ गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. हे भाऊ बहिणीला ‘कचरा’ म्हणत तिला चिडवताना दिसत आहेत. हा मजेशीर व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

हेही वाचा : रुसलेल्या भावाला मनवताना दिसली चिमुकली बहिण, गोंडस बहिण भावाचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आठवेल बालपण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

wedding_vibez76 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “भाऊ असेच असतात.. फक्त चिडवण्यासाठी असे म्हणतात पण नंतर खूप रडतात.” अनेक युजर्सनी आपल्या बहिणीला टॅग करत त्यांच्या लग्नात असाच डान्स करणार असल्याचे कमेंट्समध्ये सांगितले.