सिंहांना केवळ शक्तिशाली प्राणी म्हटले जात नाही तर ते खरोखर शक्तिशाली आहेत हे ते दाखवून देतात. ते जंगलातील कोणत्याही मोठ्या प्राण्याला आपले शिकार बनवतात. हत्ती आणि रान म्हशीसारख्या मोठ्या प्राण्यांची शिकार करण्यातही सिंह निपुण आहेत. तथापि, सिंह जेव्हा मोठ्या प्राण्याची शिकार करतात तेव्हा ते शिकार कळपात करतात. सिंहांचे शिकार करतानाचे व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात, जे पाहून खूप आश्चर्य वाटते. असाच एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सिंहांचा कळप महाकाय जिराफांची शिकार करताना दिसत आहे.

कशी केली शिकार?

व्हिडीओमध्ये सुरुवातीला असे दिसते की एक सिंह जिराफाचा मागचा पाय पकडतो आणि चावतो. त्यानंतर आणखी बरेच सिंह तिथे येतात आणि त्याला पकडतात आणि जमिनीवर फेकण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटी जिराफाला खाली पाडतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जिराफ त्यांच्या तावडीतून सुटण्याचा जास्त प्रयत्न करत नाही. सहसा कोणताही प्राणी सिंहांच्या तावडीत सापडला तर ते शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्यापासून सुटण्याचा प्रयत्न करतात. तथापि, व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये असे म्हटले आहे की जिराफ म्हातारा झाला होता, म्हणूनच कदाचित त्याला इच्छा असूनही पळून जाण्याचा प्रयत्न करता आला नाही.

(हे ही वाचा: शिकार करण्यासाठी चित्त्याने घेतली हरणावर झेप पण…; बघा Viral Video)

Credit : bestialnature / Instagram

(हे ही वाचा: Pune Metro: पुणेरी आजोबांनंतर आता मेट्रोमधील आईचा मजेशीर Video Viral)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा आश्चर्यकारक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रमवर शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत जवळ जवळ २ लाख व्ह्यूज मिळाले आहेत, तर ४ हजारांहून अधिक लोकांनी व्हिडीओला लाईक केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.