scorecardresearch

शिकार करण्यासाठी चित्त्याने घेतली हरणावर झेप पण…; बघा Viral Video

हा मजेदार व्हिडीओ भारतीय वन सेवेचे अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे

Wildlife Video
व्हायरल व्हिडीओ (फोटो: @susantananda3 / Twitter )

वन्यजीव नेहमी आपल्या भक्ष्याच्या शोधात असतात आणि जेव्हा त्यांना संधी मिळते तेव्हा ते त्यांच्यावर हल्ला करतात. हे प्राणी शिकार पकडण्यासाठी धूर्तपणा आणि वेग दोन्ही वापरतात. हे प्राणी आपल्या ताकदीच्या आणि आश्चर्यकारक उर्जेच्या जोरावर इतर प्राण्यांवर क्षणात हल्ला करतात. विशेषतः सिंह, चित्ता या मोठ्या प्राण्यांची शैली पाहण्यासारखी असते. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ शेअर केले जातात, ज्यामध्ये प्राणी एकमेकांची शिकार करताना दिसतात. पण प्रत्येक वेळी त्यांना बळी पडतातच असं होत नाही. गेल्या काही दिवसांपासून हेच दर्शवणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका हरणाला चित्ताने पकडले आहे आणि त्याला त्याची शिकार बनवायचे आहे. परंतु समोर चित्ता पाहून हरण घाबरत नाही आणि तेथून पळून जाण्याचा प्रयत्नही करत नाही. अशा स्थितीत जेव्हा चित्ता त्याला आपला शिकार बनवण्यासाठी त्याच्यावर झेपावतो तेव्हा बंदिस्तपणामुळे तो आपल्या योजनेत यशस्वी होत नाही आणि हतबल होऊन नुसता बघत राहतो.

(हे ही वाचा: Pune Metro: पुणेरी आजोबांनंतर आता मेट्रोमधील आईचा मजेशीर Video Viral)

(हे ही वाचा: VIRAL VIDEO : म्हशींच्या कळपापासून वाचण्यासाठी सिंह थेट झाडावर चढला, जंगलाचा राजा घाबरला का?)

नेटीझन्सची प्रतिक्रिया

हा मजेदार व्हिडीओ भारतीय वन सेवेचे अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. यासोबत त्यांनी मजेशीर कॅप्शन लिहिलं आहे – विंडो शॉपिंग बाय चित्ता..! या व्हिडीओला आत्तापर्यंत ६९ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यासोबतच या व्हिडीओवर मजेशीर कमेंटही केल्या जात आहेत. एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, ‘कुंपणाच्या अडथळ्यामुळे चित्ता आपली खरेदी करू शकला नाही.’ आणखी एका यूजरने लिहिले की, ‘चित्याची प्रतिक्रिया पाहून आश्चर्यचकित झालो.’ याशिवाय इतर अनेक यूजर्सनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The leopard jumped on the deer to hunt but watch viral video ttg

ताज्या बातम्या