काही पोलीस कर्मचाऱ्यांनी एका ट्रक चालकाचा आणि अजगराचा जीव वाचवला आहे, या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पोलिसांच्या या धाडसाचे नोएडा पोलीस विभागासह नेटकऱ्यांकडून कौतुक केलं जात आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका ट्रकमधून जवळपास आठ फुट लांबीच्या अजगराला बाहेर काढल्याचं पाहायला मिळत आहे. ही घटना मागील आठवड्यात ग्रेटर नोएडातील परी चौकात घडल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी उपनिरीक्षक देवेंद्र राठी आणि इतर पोलीस कर्मचार्‍यांनी दोरीच्या साह्याने अजगराला पकडल्याचं पोलिसांनी सांगितलं.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये ट्रकच्या पुढील भागात म्हणजे ड्रायव्हरच्या केबिनमध्ये शिरण्याचा प्रयत्न करणारा एक भलामोठा अजगर दिसत आहे. शिवाय त्याचे शरीर ट्रकच्या मागील भागापर्यंत पसरल्याचं दिसत आहे. त्यामुळे अजगर ट्रकच्या मागील बाजूने पुढे जाण्याचा प्रयत्न करत असल्याचा अंदाज लावला येऊ शकतो. व्हिडीओतील अजगर ड्रायव्हरच्या केबिनमध्ये जायच्या आधीच कोही पोलीस त्या अजगराला दोरीने बांधून ट्रकमधून बाहेर काढताना दिसत आहेत. यावेळी अजगराला ट्रकमधून बाहेर काढताच ते पळून जाण्याचा प्रयत्न करते आणि एका बाईकला धडकते. त्यानंतर पोलीस पुन्हा त्याला दोरीच्या साह्याने बांघतात आणि एका पोत्यात भरतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी पोलीस कर्मचार्‍यांचे तोंडभरुन कौतुक केल्याचं पाहायला मिळत आहे. एका युजरने लिहिलं, “पोलिसांनी खूप छान काम केलं, सलाम.” तर नेटकऱ्यांनी याआधीही यूपी पोलिसांच्या एका कामगिरीसाठी त्यांचे कौतुक केले होते. पोलिसांनी एका हरणाचा व्हिडिओ पोस्ट केला होता जो रस्ता ओलांडण्यापूर्वी वाहतूक थांबण्याची शांतपणे वाट पाहतो आणि ट्रफीक संपल्यावर हरीण झेब्रा क्रॉसिंगवर रस्ता ओलांडतो. या व्हिडीओतून पोलिसांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला होता.