Viral Video : पावसाळा सुरू झाला आहे. सगळीकडे पावसाचे वातावरण आहे. अनेक जण पावसाचा आनंद लुटण्यासाठी वीकेंडला निसर्गाच्या सानिध्यात फिरताना दिसत आहे तर काही लोक गरमा गरम भजी खात घरच्या घरी पावसाचा आनंद लुटत आहे पण काही लोकांसाठी हाच पाऊस एक मोठी शिक्षा असते. (a man carries Hand Cart Pushers in heavy rain video goes viral)

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती भर पावसात हातगाडी वाहून नेताना दिसत आहे. काही लोकांना आनंद, गारवा आणि सुखाचे क्षण देणारा हा पाऊस मात्र या व्यक्तीला संघर्ष करायला लावतोय. त्यामुळे प्रत्येक क्षण हा सर्वांसाठी सारखा नसतो, हे खरंय. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओ रसत्यावरील आहे. एका सिग्नलवर गाड्या थांबल्या आहे आणि जोरदार पाऊस सुरू आहे. या भर पावसात एक व्यक्ती हातगाडी घेऊन सिंग्नलवर थांबला आहे. पावसात तो भिजत आहे पण तरी तो हिंमतीने सिग्नलवर हातगाडी घेऊन उभा आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : VIDEO: ‘हे फक्त पुण्यातच होऊ शकतं’ परस्परांचे स्पर्धक झाले परस्परांचे मित्र; पुण्याच्या रस्त्यावर नेमकं काय घडलं पाहाच

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : रडून, हात जोडून दयेची याचना करणाऱ्या कुटुंबावर हल्ला? Video मुळे हिंदू- मुस्लिम वादाची ठिणगी पेटली, पाहा खरं काय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

59rancho_ranjeet या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “हा व्हिडीओ पाहून मी भावूक झालो” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.एका युजरने लिहिलेय, “एक पुरुष, एक वडील, एक मुलगा, एक पती नेहमी त्याच्या कुटुंबासाठी संघर्ष करतो” तर एका युजरने लिहिलेय, “माझी इच्छा आहे की हा व्हिडीओ यांच्या मुलांनी पाहावा आणि त्या मुलांनी खूप चांगले काम करावे आणि वडिलांना अभिमान वाटावा, असे काम करावे” आणखी एका युजरने लिहिलेय, “एक माणूस आपल्या कुटुंबासाठी काहीही करू शकतो.” एक युजर लिहितो, “देवा, या माणसाला सर्वकाही दे जे त्याला पाहिजे” अनेक युजर्स हा व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत. काही युजर्सनी या व्यक्तीसाठी प्रार्थना सुद्धा केली आहे.”