रस्त्यावर अनेकदा आपल्यासमोर कोणीतरी पटकन हात पुढे करून खायला मागते किंवा पैसे मागतो…अशावेळी आपण पुढे जा म्हणतो आणि त्यांना टाळतो. काहीजण असा दावा करतात की हे लोक काहीही मेहनत न करता नुसते पैसे मागतात. आपण त्यांना पैसे देऊन त्यांच्या या वागण्याला प्रोत्साहन देतो असे म्हणातात आणि त्यांची मदत करणे टाळतात. पण काही लोक असेही असतात जे कष्ट करून पैसे कमावण्याचा प्रयत्न करतात. ट्रॅफिक सिग्नलाल तुम्ही पाहिले असेल की अनेकदा काही जण लिंबू मिरची, प्लास्टिक बॅग, फुगे, फुल, हार अथवा गजरे घेऊन समोर येतात आणि आपल्याला खरेदी करण्याची विनंती करतात. तर काही जण कारची कास पुसून देतात आणि मग त्यासाठी पैसे मागतात. अशावेळीही अनेकजण त्यांची मदत करण्यास टाळाटाळ करतात. हे दृश्य पाहिल्यानंतर असा प्रश्न पडतो की, खरंच जगात माणुसकी किंवा चांगुलपणा राहिलाय का? पण अजूनही या जगात काही चांगल्या मनाची माणसे आहे जे माणूसकी जपतात. माणुसकी आणि चांगुलपणा ही अशी गोष्ट आहे जी आजच्या काळात फार कमी वेळा लोकांमध्ये पाहायला मिळते. सध्या अशाच एका व्यक्तींचा व्हिडीओ सध्या चर्चेत येत आहे. या व्यक्तीने रस्त्यावर कार साफ करणाऱ्या मुलांना चक्क फाइव्ह स्टार हॉटलेमध्ये जेवायला नेले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आलिशान हॉटेलमध्ये जाऊन जेवण्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतो आहे. हा व्हिडीओ पाहून लोक भावूक होत आहेत.

कवलजीत सिंह छाबड़ा यांनी काही दिवसांपूर्वी हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकांउट @kawalchabra वर शेअर केला होता. व्हिडीओमध्ये दिसते की रस्त्यावर काही मुले कवलजीत यांची कार साफ करून देतात आणि १० रुपये मागतात.त्यानंतर कवलजीत त्या मुलांना विचारतात, तुम्ही हे सर्व काय करत आहात? त्यावर ते मुले सांगतात की, “आम्ही १० रुपये मागितले कारण रोटी खायची आहे.” हे ऐकून कवलजीत मुलांना विचारतात की, कुठे खाणार आहात, त्यावर मुलगा सांगतो की, इथे हॉटेलच्या बाहेर गाडी उभी आहे तिथे जाऊन.” त्यानंतर तुम्हाला मी सर्वांना रोटी खायला घालतो असे सांगून त्यांना कारमध्ये बसण्यास सांगतो.

हेही वाचा – बंगळुरूच्या ट्रॅफिकमध्ये अडकल्याने व्यक्तीची चुकली ट्रेन, फिल्मी स्टाइलमध्ये रिक्षावाल्याने केली मदत; पाहा Viral Video

फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये मुलांना जेवायला घेऊन जातो


सर्व मुलांना कवलजीत फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये घेऊन जातो. आलिशान हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसून येतो. त्यांच्या आनंदाला सीमा राहात नाही. कवलजीत त्यांना पिझ्झा, पाणीपुरी, बिर्याणीसह अनेक पदार्थ खायला देतात. त्यानंतर सर्व मुलं बुफे जेवणाचा आनंद घेतात आणि मिठाई देखील खातात.

व्हिडिओला कॅप्शन देत त्यांनी लिहिले की, ‘ट्रॅफिक लाइटमध्ये अडकलेली मुले ५ स्टार हॉटेलजवळ जेवणाच्या पैशासाठी कार साफ करत होती. नुसते पैसे देण्याऐवजी मी त्यांना माझ्या गाडीत बोलावले. रात्रीच्या जेवणासाठी त्याच ५ स्टार हॉटेलमध्ये पोहोचल्यावर त्यांना फार आनंद झाला, ही त्याच्यासाठी पहिलीच वेळ होती.त्यांचा आनंद खरा होता आणि तो माझ्यापर्यंत पोहोचला. त्यांना फॅन्सी फूडचा आस्वाद घेताना पाहणे हृदयस्पर्शी होते. ते शेकडो वेळा माझे आभार मानत होते आणि त्यामुळे संपूर्ण अनुभव खूप भावूक झाला. जीवनाचे सौंदर्य केवळ वैयक्तिक विजयांमध्ये नाही तर इतरांची स्वप्ने जाणून घेणे आणि ती प्रत्यक्षात पूर्ण करण्यात आहे.

हेही वाचा – “माणुसकी अजूनही जिवंत आहे!” चेन्नईत पूराच्या पाण्यात अडकलेल्या कुत्र्यांचा व्यक्तीने वाचवला जीव; लोकांनी केले कौतूक

व्हिडीओ पाहून नेटकरीही झाले भावूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडिओ पोस्ट केल्यापासून ३२ दशलक्षपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे आणि त्याला चार दशलक्षाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. कवलजीतच्या या कामाचे नेटकरी कौतुक करत आहेत. एका युजरने लिहिले की, “या माणसासाठी अत्यंत आदर.” दुसर्‍याने लिहिले, “खूप छान, मला तुझा खूप अभिमान आहे.”