Viral Video : सध्या चॅटजीपीटीमुळे सर्व काही सोपी झाले आहे. चॅटजीपीटीवर सर्व प्रश्नांची उत्तरे सहज मिळतात पण सध्या एक असा व्हिडीओ समोर आला आहे की हा व्हिडीओ पाहून तुम्ही चॅटजीपीटी कायमचे विसराल. हो. हे खरंय.
उडुपी येथील श्री विठ्ठल टी कॉफी हाऊसचे हे गृहस्थ अत्यंत वेगाने मेन्यू कार्ड बोलून दाखवतानाचा व्हिडीओ प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला आहे. सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.हा व्हिडीओ पाहून तुम्ही थक्क व्हाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की हे गृहस्थ मेन्यू कार्ड बोलून दाखवत आहे. ते इतक्या वेगाने मेन्यू कार्ड सादर करतात की त्यांच्या समोर चॅटजीपीटीची क्षमता काहीच नाही.ते सर्व पदार्थांचे नाव घेताना व्हिडीओत दिसत आहे.हा व्हिडीओ अचंबित करणारा आहे.
युजर्सनी सुद्धा या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर” तर एका युजरने लिहिलेय, ” खरं बोललात” आणखी एका युजरने लिहिलेय, “देशी चॅटजीपीटी”

हेही वाचा : “वेड्या बहिणीची वेडी रे माया…” गाणं गाताना चिमुकलीने आईला विचारले, मला वेडी बोलली…? मजेशीर VIDEO व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

anand mahindra या ट्विटर अकाउंटवरुन हा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलेय, “चॅटजीपीटीने तयार केलेला नाश्त्याचा मेन्यू श्री विठ्ठल टी कॉफी हाऊस उडुपी येथील या व्यक्तीच्या क्षमतेशी जुळणार नाही. अविश्वसनीय उडुपी”
आनंद महिंद्रा असे अनेक सुंदर आणि क्रिएटिव्ह व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत असतात. यापूर्वीही त्यांनी असे अनेक अविश्वसनीय व्हिडीओ शेअर केलेले आहेत.