Viral Video : सोशल मीडियावर अनेक थक्क करणारे व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो. सध्या असाच एका व्हिडीओव व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण चालत्या दुचाकीवर लॅपटॉप उघडून मिटींग अटेंड करताना दिसेल. व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. त्याने पायावर लॅपटॉप ठेवला आहे आणि तो स्कुटी चालवण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हल्ली प्रत्येक जण स्वत:च्या कामाला खूप प्राधान्य देतो. ९ ते ५ च्या जॉबमुळे अनेक जण वैयक्तिक आयुष्य सुद्धा विसरले. आठ किंवा नऊ तासांचा जॉब दहा किंवा बारा तास करतात. या लोकांना आपण वर्कहोलिक असे म्हणतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हा तरुण सु्द्धा वर्कहोलिक वाटेल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

pm narendra modi bill gates
Video: करोना काळात थाळ्या वाजवायला का सांगितलं? पंतप्रधान मोदी बिल गेट्सना म्हणाले, “..तेव्हा आमच्या देशात याची मस्करी झाली होती!”
street cloth vendors guys dance by saying price on rhythm watch marketing funny video
Video : भर बाजारात “दोसो.. दोसो…” च्या तालावर डान्स करत विकले कपडे, तरुणांची मार्केटिंग ट्रिक पाहिली का?
women riding bikes on dangerous mountain roads
याला म्हणतात अस्सल ‘खतरो के खिलाडी’; डोंगरावरील भयानक रस्त्यावरून चढवली बाइक, महिलांचा VIDEO पाहून अंगावर येईल काटा
watch jugaad viral video
बजाजवाल्यांनी कधी विचारही केला नसेल की स्कुटरचा असा होईल उपयोग, जुगाड पाहून तुम्हीही व्हाल अवाक्, पाहा व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक तरुण भर रस्त्यावर स्कुटी चालवताना दिसत आहे. व्हिडीओ तुम्हाला दिसेल की तो पायावर लॅपटॉप ठेवून स्कुटी चालवतोय. तो लॅपटॉप उघडा ठेवून चालत्या स्कुटीवर झुम मिटींग अटेंड करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. जीव धोक्यात घालून चालत्या स्कुटीवर लॅपटॉप चालवत असल्याामुळे असे कोणते तातडीचे काम आले असेल, असा प्रश्न कोणाच्याही मनात येऊ शकतो. तुम्ही आजवर चालत्या दुचाकीवर फोनवर बोलताना पाहिले असेल पण या व्हिडीओमध्ये तरुण चक्क लॅपटॉप उघडा करून झूम मीटींगमध्ये बोलतना दिसत आहे.सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : मुलीशी पंगा घेणे चिमुकल्याला पडले महागात! मुलीने धू… धू… धुतले, Video होतोय व्हायरल

peakbengaluru या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “भाऊ एखाद्या आयटी कंपनीसाठी काम करत असावा कारण त्याला दर आठवड्याला ७० तास कमी आहेत” तर एका युजरने लिहिलेय, ” लोकं हे कंपनीच्या लॅपटॉपबरोबर करतात.” आणखी एका युजरने लिहिलेय, “काय अडचण आली असेल?” एक युजर लिहितो, “मोबाईलवर मीटिंग अटेंड करायची. असा स्टंट कशाला?”