Viral Video : सोशल मीडियावर लहानांपासून वयोवृद्धांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ अगदी थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक आजी तुफान डान्स करताना दिसत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ एका कार्यक्रमातील आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की, अनेक स्त्रिया डान्स करीत आहेत; पण त्यापैकी
८०-९० च्या जवळपास वय असणारी एक आजी तुफान डान्स करताना दिसत आहे. आजीचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. “मोनिका, ओह माय डार्लिंग” या गाण्यावर आजीने खूप चांगला ठेका धरला आहे. आजीच्या डान्स स्टेप्स आणि हावभाव पाहून सोशल मीडियावर युजर्सनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. खूप जुना असलेला हा व्हिडीओ आता पुन्हा व्हायरल झाला आहे.

हेही वाचा : Weekend Marriage : लग्नानंतरही राहा, असे सिंगल; जाणून घ्या वीकेंड मॅरेज ही नवी कन्सेप्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

zindagi.gulzar.h या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “खूप सुंदर, आजी तू कमाल केलीस” या व्हिडीओवर युजर्सनी उतारवयातही आजीची ऊर्जा पाहून एकापेक्षा एक भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप खूप आदर आणि प्रेम” तर एका युजरने लिहिलेय, “आजी तरुण पिढीसाठी एक प्रेरणा आहे. आजीला दीर्घायुष्य लाभो.” आणखी एका युजरने लिहिलेय, “आजी, तुझी ऊर्जा पाहून माझ्याकडे शब्द नाहीत.”