Shocking video: तुम्ही कितीही सावधगिरी बाळगली तरीदेखील अनेकदा दुसऱ्याच्या चुकीमुळे अपघात घडतात. नुसतं गाडी चालवतानाच नाही तर रस्त्यावरून चालतानादेखील लोकांनी लक्ष ठेवलं पाहिजे. अशातच प्राण घ्यायला आलेल्या यमराजाला माणसाने परत पाठवल्याचं तुम्ही बऱ्याच फिल्ममध्ये पाहिलं आहे. असं प्रत्यक्षात शक्य नाही हे आपल्यालाही माहिती आहे, कारण मृत्यू कुणाच्या हातात नाही. पण, तरी फिल्मी लाइफप्रमाणे रिअल लाइफमध्ये असा चमत्कार दिसून आला. एका तरुणाने खरंच यमराजाला चकवा दिला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, हाच आहे देव अस्तित्वात असल्याचा पुरावा..
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रात्रीची वेळ आहे संपूर्ण रस्ता मोकळा आहे, लांब लांब पर्यंत एकही वाहन या रस्त्यावर नाहीये तसेच मागेही गाड्या नाहीयेत. अशातच या रात्री अंधारात एक व्यक्ती या रस्त्यावरुन जात असाताना अचानक एक प्राणी त्याच्या गाडीसमोर येतो. या प्राण्याला पाहून हा व्यक्ती लांबूनच गाडीची स्पीड कमी करतो आणि कार थांबवतो. यानंतर त्याला पुढे काहीतरी असल्याचं जाणवते. त्यानंतर तो कारमधून खाली उतरतो आणि त्याला जे दिसतं ते पाहून त्याला मोठा धक्का बसतो.
आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की नेमकं झालं तरी काय? तर झालं असं की या रस्त्यावर भला मोठा खड्डा पडला होता. या व्यक्तीनं कार थांबवली नसती तर तो कारसकट खड्ड्यात पडला असता आणि मोठा अपघात झाला असता. मात्र त्याच वेळी एक प्राणी तिथे आल्यानं हे संकट टळलं.ही व्यक्ती या घटनेत थोडक्यात बचावल्याचं दिसत आहे. या सर्व प्रसंगाला लोक चमत्कार आणि देव अस्तित्वात असल्याचा पुरावा म्हणत आहे. तुम्हीही हा व्हिडीओ पाहून थक्क व्हाल.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ सर्वांसाठी एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे. आपण सर्वांनी रस्त्याने चालताना तसेच गाडी चालवताना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. जर तुम्ही सावधगिरी बाळगली, तर तुम्ही अशा अपघातांपासून स्वत:ला तसेच इतरांना वाचवू शकता. नेटकरीही व्हिडीओवर कमेंट करत आहेत, एकानं म्हंटलंय” नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला” दुसऱ्या युजरने प्रतिक्रिया दिलीय “नशीब आणि कर्मावर ज्यांना विश्वास नाही त्यांनी हे पाहाव.”