Viral Video : सोशल मीडियावर दर दिवशी अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कोणी नवीन जुगाड शोधताना दिसतो, तर कोणी नवीन कला दाखवताना दिसतो. कधी कोणी डान्स करताना किंवा गाणी म्हणताना दिसतो तर कोणी समाजसेवा करताना दिसतो. अनेक लोक सोशल मीडियावर हटके व्हिडीओ रिल्स शेअर करत असतात.

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अननस गाडा दिसत आहे आणि गाड्यासमोर अननस विक्रेता खूर्चीवर बसलेला दिसत आहे.व्हिडीओत तुम्हाला दिसेल की लोकांनी अननस खरेदी करावे म्हणून या तरुण विक्रेत्याने शक्कल लढवली आहे. त्याने चक्क त्याची हेअर स्टाईल अननससारखी केली आहे. त्याची हेअर स्टाईल पाहून कोणीही थक्क होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

काय आहे प्रकरण?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला रस्त्यावर अननसचा गाडा दिसेल आणि या गाड्यासमोर अननस विक्रेता तरुण दिसेल. या तरुणाने मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरत अनोखी हेअर स्टाईल केली आहे. त्याने अननस सारखी हेअर स्टाईल बनवली आहे. त्याची हटके हेअर स्टाईल सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. जास्तीत जास्त ग्राहक अननसाच्या गाड्याकडे आकर्षित व्हावे, त्यासाठी या तरुणाने अनोखा जुगाड शोधला आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : लग्नपत्रिका नव्हे! या हटके पत्रिकेतून केली लोकांना मतदान करण्याची विनंती, एकदा क्लिक करून नीट पाहाच

lifeisbeautiful080808 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “त्याला त्याचे काम खूप आवडते” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मी जर ग्राहक असतो, तर त्याचे डोके विकत घेतले असते” तर एका युजरने लिहिलेय, “हा तरुण खूप चांगला व्यावसायिक आहे जो ग्राहकांना आकर्षित करतोय” आणखी एका युजरने लिहिलेय, “मस्त आयडिया आहे” अनेक युजर्सनी व्हिडीओ पाहून हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.