सोशल मिडिया हा आपल्या रोजच्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट झाला आहे. दिवसातील कित्येक तास आपण सोशल मीडियावर दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहण्यात घालवत आहोत. त्यामुळे नव्या पिढीसाठी सोशल मिडिया हेच त्याचं जग झालं आहे. एक तर सोशल मीडियावर व्हिडिओ पाहात राहायचे किंवा सोशल मीडियासाठी व्हिडिओ बनवयाचे हेच त्यांचे आयुष्य झालं आहे. तरुणाईच नव्हे तर आता चिमुकले देखील सोशल मीडियावर व्लॉग व्हिडिओ पोस्ट करताना दिसतात. सध्या अशाच एका चिमुकल्याच्या व्लॉगची चर्चा होत आहे. विशेष म्हणजे या चिमुकल्याने त्याच्या प्रेक्षकांसाठी एक रॅप तयार केले आहे. त्याचे हे रॅप ऐकून तुम्ही पोट धरून हसाल.

इंस्टाग्रामवर akshay_bhosale05 नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये एक चिमुकला आपल्या आईला वैतागलेला दिसत आहे. त्याला अंघोळ करायची नाही, दात घासायचे नाही, शाळेत जायचे नाही…चिमुकल्याचीही व्यथा त्याने रॅपद्वारे मांडली आहे. चिमुकल्याची भाषा थोडी हिंदी थोडी मराठी आहे पण तरी आपल्या गोंडस आवाजात त्याचा हा रॅप एकदा नक्की ऐका..

व्हिडीओच्या सुरुवातीला चिमुकला सांगतो, “हॅलो दोस्तो, आता माझा रॅप ऐका”
असे म्हणत तो आपल्या बोबड्या भाषेत रॅप ऐकवतो,
“अक्षय का विषय बहोत हार्ड है
अक्षय को अंघोळीचा त्रास है
अक्षय उसकी आई से परेशान है
अक्षय को दात घासने का कंटाळा है
अक्षय की आई उसे खोट बोलके फसा रही है
हात-पाय बोलके अंघोळ घाल रही है
अक्षय स्कूल जाने को तयार नही है
जबरदस्ती स्कूल भेज रही है
दात नाही फिर दात घास रही है
सब लोग जबरदस्ती कर रहे है
कैसा लगा मेरा मजाक
कैसा लगा मेरा रॅप”

हेही वाचा – Video : “लहानपणी हा खेळ कोणी खेळला आहे?” चिमुकल्यांचा खेळ पाहून आठवतील बालपणीचे दिवस

अक्षयचा रॅप

“अक्षयचा विषय खूप अवघड आहे,
अक्षयला अंघोळीचा त्रास आहे अक्षय अक्षय त्याच्या आईला वैतागला आहे.
अक्षयला दात घासण्याचा कंटाळा आहे
अक्षयची आई त्याच्याशी खोट बोलून त्याला फसवत आहे
हात-पाय धुते म्हणत पूर्ण अंघोळ घालते आहे.
अक्षय शाळेत जाण्यासाठी तयार नाही तरी जबरदस्ती शाळेत पाठवत आहे
अक्षयला दात नाही तरी त्याचे दात घासते आहे
सर्व लोक जबरदस्ती करत आहे
कशी वाटली माझी गंमत,
कसा वाटला माझा रॅप”

हेही वाचा – “आयुष्यात हे दिवस परत आले पाहिजे”, मैदानावर कवायत करणारे विद्यार्थी पाहून तुम्हालाही आठवेल तुमची शाळा, पाहा सुंदर Video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चिमुकल्याचा हा रॅप ऐकून तुम्ही देखील खळखळून हसला असाल. नेटकऱ्यांनाही चिमुकल्याचा व्हिडिओ फार आवडला आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत चिमुकल्याचे कौतूक केले आहे. एकाने लिहिले की, “अक्षयचा रॅप खुपचं हार्ड है”
दुसरा म्हणाला की, “लय भारी हिंदी बोलतोस बाळा तू “