कोणाचं नशीब कधी पालटेल हे सांगता येत नाही, असं म्हटलं जातं. शिवाय सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात आपण अशा अनेक बातम्या वाचत असतो, ज्यामध्ये अनेक लोक रात्रीत करोडपती होतात. सध्या अशीच एक बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका रिक्षा चालकाचं नशीब रात्रीत पालटलं आहे.

रात्रीत करोडती झालेल्या व्यक्तीचं नाव गुरदेव सिंह असून ते पंजाबमधील लोहगड गावामध्ये राहतात. गुरदेव यांच्या घरची परिस्थिती खूप हालाखीची आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते रिक्षा चालवायचे. पण म्हातारपणी का होईना त्यांची कष्टाच्या कामापासून सूटका झाली आहे. कारण रिक्षाचालक गुरुदेव यांनी बैसाखी बंपर लॉटरीमध्ये तब्बल २.५ कोटी रुपयांचे पहिले बक्षीस जिंकल्यामुळे ते रात्रीत कोट्यवधीचे मालक बनले आहेत. त्यांनी हे बक्षीस जिंकताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर माजी आमदार सुखजित सिंग काका लोहगड यांनी गुरुदेव यांच्या कुटुंबीयांना मिठाई भरवून अभिनंदन केलं आहे.

हेही पाहा- ‘मला बाई दारूड्या भेटलाय नवरा…’ गाण्यावर चिमुकल्याच्या भन्नाट डान्स, चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

दरम्यान, गरीब कुटुंबातील गुरदेव सिंग यांनी आजपर्यंत अनेक कष्टाची काम केली, दिवसरात्र रिक्षा चालवली आणि आता अचानक श्रीमंत झाल्यामुळे त्यांच्या आणि कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. देव जेव्हा द्यायला सुरुवात करतो तेव्हा तो छप्पर फाडून देतो असं म्हटलं जातं. असंच काहीसं मोगाच्या धरमकोटमधील लोहघर गावात राहणाऱ्या गुरदेव सिंग यांच्यासोबत घडलं आणि ते एका रात्रीत करोडपती बनले आहेत. यासाठी कारणीभूत ठरली बैसाखीची बंपर लॉटरी.

हेही पाहा- “वो स्त्री है…” अवजड वस्तू नेण्यासाठी तरुणीचा अनोखा उपाय, व्हायरल Video पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

रस्स्त्यावरील खड्डेही भरले –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लॉटरीचे पहिले बक्षीस जिंकल्यानंतर गुरुदेव म्हणाले, “माझी लॉटरी निघेल असे मला कधीच वाटले नव्हते, देवाने माझ्या कष्टाचं कौतुक केलं आहे. या पैशातून मी माझ्या मुलांसाठी घर बांधणार असून नातवांना चांगलं शिक्षण देणार.” रिक्षा चालवण्यासोबतच गुरदेव सिंग स्वत: रस्त्यांवरील खड्डे बुजवायचे आणि ये-जा करणाऱ्यांठी चांगला मार्ग तयार करायचे. त्यामुळे त्यांच्या या निस्वार्थ कामाचं त्यांना फळ मिळाल्याचंही अनेकजण म्हणत आहेत. तक गुरदेव सिंग यांच्या चारही मुलांनी आपल्या पत्नी आणि मुलांसह आपल्या वडिलांचे अभिनंदन केलं आहे, तर अचानक अडीच कोटी रुपयांचे पहिले पारितोषिक जिंकल्यामुळे गुरुदेव यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचा आनंद ओसंडून वाहत आहे.