आज काल चोरीच्या घटनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. भररस्त्यात महिलांच्या गळ्यातून साखळी खेचणे, मोबोईल हिसकावणे, एखाद्याला भूलवून त्याच्या जवळील पैसे किंवा मौल्यवान वस्तूंची चोरी करणे, कधी थेट घरात किंवा दुकाना घुसून चोरी करणे अशा कित्येक घटनांचे व्हिडिओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच एका चोरीच्या घटनेचा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये मद्यधुंद अवस्थेतील एक चोरटा गुपचूप एका घरात घुसून चोरी करण्याचा प्रयत्न करत होता पण घरातील महिलेच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. चोरट्याचा सामना करण्यासाठी काकूंनी मोठं धाडसं दाखवलं आहे. काकूंनी चोराला पकडण्यासाठी जे केलं ते खरंच कौतुकास्पद आहे.

seetherealindia नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती एका दरवाजाच्या मागे उभा आहे आणि बाहेर काही लोक उभे आहेत त्याला जाब विचारत आहे. एक घरात शिरलेल्या चोराला पकडण्यासाठी महिलेने घराचा लोखंडी दरवाजा बाहेरून लावला आणि त्याला कुलूप लावले आहे. व्हिडीओमध्ये महिला सांगते की,”महिला घरात एकटी होती. तेव्हा चोरटा चावीने दरवाजा खोलून गुपूचूप घरात शिराला आणि खोलीत जाऊन कपाट उघडून चोरी करणार होतो तेवढ्यात काकू कोण आले पाहायला तेथे गेल्या. काकूंना पाहून तो चोर दारामागे लपला.

काकूंनी प्रसंगावधान दाखवत घराच्या बाहेर पडले आणि दाराला कुलूप लावून घेतले. त्यानंतर आरडा ओरडा करून शेजार्‍यांना बोलावले. शेजारी जमा झाल्यानंतर काकूंनी त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. एक व्यक्तीने सर्व प्रकार व्हिडीओमध्ये कैद केला आहे. व्हिडीओमध्ये काही लोक सांगतात की,”त्याने दारू प्यायली आहे. चोराला पोलिसांच्या ताब्यात द्या असे काही जण म्हणत आहे.

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काकूंनी दाखवलेल्या धाडसाचे सर्वजण कौतुक करत आहे. seetherealindia नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, काकूंनी चोराला घरात कोंडले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओवर कमेंट अनेकांना काकुंचे कौतुक केले. एकाने कमेंट केले की, ” भारतीच्या महिलांच्या नादाला लागू नका.”