Shocking video:सिंह हा जंगलाचा राजा आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. तसेच तो जंगलातील सगळ्यात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. त्यामुळे जंगलातील इतर प्राणी देखील त्याच्यापासून लांबच राहातात. तर दुसरीकडे पाण्यातील सगळ्यात खतरनाक प्राणी म्हणजे मगर असते. पाण्यात मगरीसोबत पंगा घेणं म्हणजे, स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण दिल्यासारखं आहे. कारण, जंगलात सिंह आणि पाण्यात मगरच राजा असते. पण आता चक्क मगरीशी सिहानं पंगा घेतला आहे. जेव्हा मगर आणि सिंह एकमेकांशी भिडतात तेव्हा काय होते…आता असाच या झालेल्या हल्ल्याचा व्हायरल व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. जो पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल.

हा व्हायरल व्हिडिओ राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील रणथंबोर राष्ट्रीय उद्यानाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये एक मगर तलावाच्या बाहेर जमिनीवर विसावा घेत असल्याचे दिसते. तितक्यात तिथे जंगलाच्या राजाची म्हणजेच वाघाची एंट्री होते. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. एक मगर नदीच्या बाहेर शांतपणे पडून आहे. तेवढ्यात तिला समोरून एक वाघ येताना दिसला. हा वाघ पाणी पिण्यासाठी नदीवर येत आहे. पण या मगरीला पाहताच तो प्रचंड वेगानं टेकडी उतरला. मात्र हल्ला करण्याआधीच ती मगर पाण्यात शिरली.मगर आपला जीव वाचवण्यासाठी पाण्यात शिरली आणि काही सेकंदातच ती गायब झाली. जर का ती आणखी थोडा वेळ काठावर बसली असती तर वाघासोबत तिचं घनघोर युद्ध झालं असतं.

असं म्हणतात की जंगलाचा एकच नियम असतो, जो ताकदवर असतो तो राज्य करतो आणि तो दुर्बल असतो त्याचं आयुष्य इथे खूपच कमी असतं. जंगलातील प्राण्यांना त्यांची भूक भागवण्यासाठी इतर प्राण्यांना मारावं लागतं आणि त्या हल्ल्यातून जे वाचतात, त्यांचं आयुष्य आणखी काही दिवसांसाठी वाढतं.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत १ लाख ५७ हजारांहून अधिक व्ह्यूज आणि दीड हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. युजर्सनी कमेंटही केल्या आहेत. काहींनी हे अत्यंत दुर्मिळ दृश्य असल्याचे म्हटले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर battilalgurjar_ranthambhore नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आलाय.