Husband Wife Fighting Viral Video: सोशल मीडियावर नवरा-बायकोमधील भांडणाचे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मनोरंजक असतात तर काही धक्कादायक असतात. अनेकदा नवरा बायकोमधील किरकोळ वाद हाणामारीपर्यंत पोहचल्याचंही तुम्ही पाहिलं असेल. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हीही आश्चर्यचकित होऊ शकता. कारण व्हिडीओतील नवरा-बायको एकमेकांना अशा पद्धतीने मारहाण करत आहेत की, आता ते एकमेकांचा जीव घेतात की काय? असा प्रश्न व्हिडीओ पाहणाऱ्यांना पडला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नवरा बायकोची रस्त्यावरच भांडणं सुरु झाली. यावेळी दोघंही एकमेकांना अक्षरश: मारत आहेत. कुणीच ऐकायला तयार नाही. याच भांडणात दोघांचाही तोल जातो आणि ते बाजुच्या गटरात पडतात. मात्र ऐवढं होऊनही दोघं एकमेकांना मारणं काही थांबवत नाही. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. हे कोणतं ठिकाण आहे, नवरा बायको नेमके का एकमेकांना मारत आहेत याची माहिती मिळाली नाहिये.त्यामुळे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी तो ठरवून शूट केल्याचं म्हटलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> टवाळखोर तरुणांमुळे तरुणी गेली ट्रेनखाली; त्याचा एक धक्का अन्…रेल्वे स्टेशनवरचा VIDEO व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर अनेक नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिलं, “दोघेही कॉमेडी करत आहे. मला वाटतं हे नाटक आहे.” तर आणखी एका यूजरने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे, त्याने लिहिलं, “माझ्या लग्नानंतर अशी भांडणे झाली नाहीत तर मी घटस्फोट घेईन.” आणखी एक युजरने लिहिलं, “देव या जोडप्याला सुरक्षित ठेवो.”