Viral video on social media: प्रेमाला मर्यादा नसतात. प्रेम कधी, कुणावर जडेल हे सांगू शकत नाही. भारतीय मुलांमध्ये परदेशी शिक्षण किंवा नोकरीसाठी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे परदेशी मुलींशी प्रेम विवाह होत आहेत. भारतीय संस्कृतीची क्रेझ जगभरात आहे. यामुळे भारतीय संस्कृतीच्या प्रेमात पडलेल्या परदेशी मुली भारतीय मुलांना जोडीदाराच्या रुपात पसंती देताना दिसत आहेत. तसे पाहता, भारतीय लोक परदेशी मुलींशी लग्न करून परदेशात स्थायिक होत असल्याचे सामान्यतः दिसून येते. परदेशी मुली पतीसोबत रहायला भारतात आल्याचे क्वचितच पाहायला मिळते. सध्या एका फॉरेनच्या पाटलीनीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ही परदेशी सून खानदेशी आज्जीसोबत मराठीत गप्पा मारतेय.ा दोघींचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲपवर असे अनेक व्हिडिओ असतात जे लोक वारंवार शेअर करत असतात. असाच एक व्हायरल व्हिडिओ ही आम्हाला मिळाला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, गोरीगोमटी फॉरेनर पाहून आज्जी बघतच राहिली आहे. ही फॉरेनची मुलगी खानदेशी सून झाली आहे. एवढच नाहीतर या फॉरेनच्या मुलीला चक्क आपलं मराठी अगदी परफेक्ट बोलता येतंय. आजीबाई तिला प्रश्न विचारत आहेत, तशी ती त्या प्रश्नांचं मराठीत उत्तर देत आहे. आज्जी विचारत आहे कुणाच्या घरी आली तू त्यावर ती उत्तर देते मी अमेरीकेची आहे, आणि आता तुमची सून आहे. यावर आज्जी आश्चर्य चकीत होते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बापरे! सोफ्यावर ठेवलेल्या बंदुकीला खेळणं समजत ३ वर्षांच्या चिमुकलीनं स्वत:वरच गोळी झाडली, धक्कादायक VIDEO व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्हिडीओवर देत आहेत. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, “भाग्यवान आहे.. तुझ्याकडे आजी आहे. काळजी घे आणि तिला जप.” तर एका युजरने लिहिलेय, “खूपच सुंदर.. अप्रतिम आजीबाई.”