नूडल्स खायला प्रत्येकाला आवडतात. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण नूडल्स आवडीने खातात. तुम्ही घरच्या घरी किंवा एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन नूडल्स खाऊ शकता. प्रत्येकाच्या आवडीचे असलेले हे नूडल्स कारखान्यात कसे बनवले जातात याबद्दल तुम्हाला माहित आहे का? याच संबधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्ही थक्क व्हाल आणि यानंतर नूडल्स खण्याआधी नक्की विचार कराल.

व्हायरल व्हिडिओमध्ये कारखान्यात नूडल्स बनवण्याची प्रक्रिया दाखवण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे कामगार स्वच्छतेशिवाय आणि घाणेरड्या पद्धतीने नूडल्स बनवत आहेत. ते नूडल्स बनवताना हातांनी पीठ मळत असून त्यांना घाणेरड्या डब्यात ठेवत आहेत. तसंच नूडल्सवर प्रक्रिया केल्यावर त्यांना गलिच्छ जमिनीवर ठेवत आहेत. नूडल्स किती घाणेरड्या पद्धतीने बनवले जातात ते या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलंय. हा व्हिडिओ ट्विटर प्रचंड पाहिला जात आहे.

Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
How to improve Cibil score tips to increase
‘सिबिल’ स्कोअर कसा सुधाराल?
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र

येथे पाहा व्हिडिओ

( हे ही वाचा: ‘हा’ आहे जगातील सर्वात लहान देश; राहतात फक्त ८०० लोकं)

हा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. तसंच यावर अनेकजण कंमेंट देखील करत आहे. यातील एका युजरने म्हटलंय, ‘हे नूडल्स उकळून तेलात तळले जातात, त्यामुळे अशा उष्णतेत जीवाणू जिवंत राहू शकत नाही’ तसच अनेकजणांनी यावर संतप्त प्रतिक्रिया देखील दिली आहे.