scorecardresearch

‘हा’ आहे जगातील सर्वात लहान देश; राहतात फक्त ८०० लोकं

जगातील सर्वात छोटा देश कोणता याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर या देशाविषयी एकदा जाणून घ्याचं..

‘हा’ आहे जगातील सर्वात लहान देश; राहतात फक्त ८०० लोकं
फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम

अनेकदा मोठ्या देशांबद्दल जगात बोलले जाते, कारण या देशांची कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चा होत असते. मात्र जगातील लहान देशांची चर्चा क्वचितच होते. यामुळेच या लहान देशांबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. जर तुम्हाला विचारले की लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या बाबतीत जगातील सर्वात मोठे देश कोणते आहेत, तर तुमचे उत्तर नक्कीच चीन आणि रशिया असेल. कारण अनेकजणांना याबाबत माहिती आहे. मात्र जगातील छोट्या देशांची नावं फारच कमी लोकांना माहीत आहेत. त्यामुळे जगातील सर्वात छोटा देश कोणता असं विचारल्यावर अनेकजण याचं उत्तर देऊ शकत नाही.

रशिया हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश आहे. या यादीत आपल्या भारताचा सातवा नंबर लागतो. तसच जर लोकसंख्येच्या बाबतीत चीन हा देश पहिल्या क्रमांकावर आहे, तर भारत आणि अमेरिका दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. तर आज आपण जाणून घेणार आहोत जगातील सर्वात लहान देशाबद्दल ज्याठिकाणी फक्त ८०० लोकं राहतात. तुम्हीही या देशाबद्दल माहिती ऐकून नक्कीच थक्क व्हाल..

जगातील सर्वात लहान देश कोणता आहे?

जगातील सर्वात लहान देश व्हॅटिकन सिटी आहे. व्हॅटिकन सिटी हा देश इटलीची राजधानी रोमच्या मध्यभागी स्थित आहे. जगातील सर्वात छोटा देश असलेल्या या देशाची स्थापना १९२९ मध्ये झाली होती. तेव्हापासून या देशाची आंतरराष्ट्रीय देश म्हणून ओळख झाली आहे. या देशाचे एकूण इटलीच्या एकूण क्षेत्रफळ ४४ हेक्टर असून त्यांची लोकसंख्या सुमारे ८०० आहे.

( हे ही वाचा: ‘हा’ आहे जगातील शेवटचा रस्ता, जिथे लोकांना एकट्याने जाण्यास परवानगी नाही)

राहतात फक्त ८०० लोक..

एका अहवालानुसार व्हॅटिकन सिटीची लोकसंख्या ही फक्त ८०० आहे. तसच या देशाची स्वतःची सेना आहे, ज्यामध्ये एकूण ११० लोक काम करतात. या सैन्यात सामील होण्यासाठी येथील नागरिकांना कठोर प्रशिक्षण घ्यावे लागते. शिवाय यासाठी निवड प्रक्रिया देखील असते. या देशात विमानतळ नाही आहे. तरीही या नागरिकांकडे व्हॅटिकन सिटीचे पासपोर्ट आहेत. याशिवाय या देशाचा स्वतःचे पोस्ट ऑफिस आणि स्वतःचे चलन आहे जे इटलीमध्ये देखील वैध आहे. व्हॅटिकन सिटी या देशात १९३० मध्ये एक रेल्वे स्थानक बांधण्यात आले होते. या रेल्वे स्थानकाचा वापर आता स्थानिकांपेक्षा पर्यटक जास्त करतात.

देशात उत्पन्नाचे साधन नाही

जगातील सर्वात छोट्या देशात उत्पन्नाचे कोणतेही वेगळे साधन नाही. मात्र जगभर पसरलेल्या कॅथलिक ख्रिश्चनांनी दिलेल्या पैशातून या देशाचे काम चालते. तसंच याठिकाणी अनेक पर्यटकही येतात तर त्यातून इथल्या स्थानिक लोकांची कमाई होते.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-01-2023 at 12:03 IST

संबंधित बातम्या