Viral Video : सोशल मीडियावर स्टंट करणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक लोक प्रसिद्धीसाठी जीव धोक्यात टाकून वाट्टेल ते करण्याचा प्रयत्न करतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विचित्र घटना कैद झाली आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला एका चालत्या चारचाकी गाडीच्या दरवाज्याला एक महिला लटकलेली दिसत आहे. विशेष म्हणजे कारचालकाने तिला एका हाताने धरलेले आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.चालत्या कारमधील हा प्रकार पाहून कोणालाही संताप येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओ

हा व्हायरल व्हिडीओ उत्तरप्रदेशमधील लखनऊ येथील आहे. या कारवर “advocate” असे लिहिलेय. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका चालत्या चारचाकीच्या दरवाज्याला एक महिला लटकलेली दिसत आहे. आणि तिला कारचालकाने एका हाताने धरले आहे. चालत्या वाहनामध्ये असा प्रकार पाहून कोणीही अवाक् होईल.या कारच्या मागे असलेल्या एका चारचाकी वाहन चालकाने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. व्हिडीओ पाहून रस्ता सुरक्षेच्या बाबतीत कोणालाही प्रश्नचिन्ह निर्माण होईल. लोकप्रिय होण्यासाठी हा एक स्टंट आहे की आणखी काही, याविषयी अद्याप माहिती समोर आलेली नाही.

Vivek K. Tripathi या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कार कोणाची आहे? कारला लटकलेली महिला कोण आहे? कारच्या आतमध्ये कोण बसले आहे? माहिती नाही.. पण गाडीवर “advocate” चा लोगो दिसतोय. ही जागा लखनऊच्या पलासियो मॉलसमोरची आहे. काय घडले हे तुम्हाला आणि पोलिसांना दिसत आहे.. नंबर सुद्ध नीट दिसत आहे.”

हेही वाचा :VIDEO : चक्क बर्फाचा गोळा सर्व्ह करतोय रोबोट, आता रोबोट वेटरची जागा घेणार? व्हिडीओ होतोय व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हे सर्व रिलसाठी करताय” तर एका युजरने लिहिलेय, “लगेच कारवाई केली पाहिजे” आणखी एका युजरने लिहिलेय, “नंबर प्रयागराज येथील आहे.” अनेक युजर्सनी व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे. काही लोकांनी या प्रकरणाचा तपास करून या वर कारवाई करण्याची मागणी केली आहे.