Viral Video : धुम्रपान करणे आरोग्यासाठी चांगले नाही. धुम्रपानामुळे फुफ्फुसांचे आजार, हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि श्वसनाशी संबंधित आरोग्याच्या समस्या जाणवतात. हल्ली अनेक तरुण मुला मुलींना धुम्रपानाचे व्यसन लागले आहे. अनेक तरुण मुले सिगारेटच्या आहारी गेले आहेत. थोडा जरी तणाव आला तरी तरुण मुले सिगारेट ओढताना दिसतात. अनेकदा पालकांना कल्पना नसते की त्यांची मुले सिगारेट ओढतात कारण मुले सुद्धा पालकांकडून त्यांचे व्यसन किंवा वाईट सवयी लपवण्याचा प्रयत्न करतात, जे अत्यंत चुकीचे आहे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणाने अनोखी चप्पल बनवली आहे आणि या चप्पलमध्ये सिगारेट, आगपेटी लपवली आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही आश्चर्य व्यक्त कराल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एका तरुणाने पायात चप्पल घातलेली दिसेल. त्यानंतर हा तरुण चप्पलमध्ये फसवलेला एक छोटा कप्पा उघडतो आणि काय आश्चर्य त्यात दोन सिगारेट लपवलेल्या असतात. त्यानंतर हा तरुण त्यातली एक सिगारेट काढतो. पुढे तो चपलीमध्ये फसवलेला दुसरा कप्पा उघडतो त्यात तीन चार आगकाड्या ठेवलेल्या असतात. त्यातली एक आगकाडी तो हातात घेतो आणि चपलीमध्ये फसवलेल्या आगपेटीच्या एका बाजूला ही आगकाडी घासतो आणि आगकाडी पेटते. त्यानंतर हा व्हिडीओ येथेच संपतो. तरुणाचा हा भन्नाट जुगाड पाहून तुम्हीही डोकं धराल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या जुगाडचा वापर करून हा तरुण लपून धुम्रपान करत असावा.

हेही वाचा : VIDEO: “उखाणा घ्यायला अजुन मुलगाच मिळाला नाय…” सिंगल मुलींसाठी भन्नाट उखाणे, तरुणीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा व्हायरल व्हिडीओ

HasnaZarooriHai या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “ही चप्पल कुठे मिळणार?” यावर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “ही चप्पल कॅन्सर हॉस्पिटलच्या बाहेर मिळेल” तर एका युजरने लिहिले, “मला पण ही चप्पल पाहिज, मला माझ्या धुम्रपान करणाऱ्या मित्रांना गिफ्ट द्यायची आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “बापरे, काय चप्पल आहे” अनेक युजर्स चप्पल पाहून अवाक् झाले आहेत.
सोशल मीडियावर जुगाडचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यापूर्वी सुद्धा असे अचंबित करणारे व्हिडीओ चर्चेत आले आहे. तुम्ही जुगाडचे अनेक व्हिडीओ पाहिले असेल पण असा व्हिडीओ पहिल्यांदाच पाहिला असेल. सोशल मीडिया चर्चा आहे की हा व्हिडीओ भारतातील नसून चीनमधील आहे.
(लोकसत्ता ऑनलाइन धुम्रपानाचे समर्थन करत नाही)