Viral Video : सोशल मीडियावर दर दिवशी वेगवेगळे हटके व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी डान्सचे व्हिडीओ तर कधी गाणी म्हणतानाचे व्हिडीओ व्हायरल होतात. कधी हटके ट्रिक व्हायरल होते तर कधी एखादं गाणं चर्चेत येते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण शिक्षकांसमोर चक्क लावणी सादर करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
लावणी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. महाराष्ट्रीयन नृत्य म्हणून लावणीची जगभरात ओळख आहे. पूर्वी फक्त महिलाच लावणी सादर करताना दिसायच्या आता पुरुष मंडळी सुद्धा लावणी सादर करताना दिसतात. सोशल मीडियावर लावणीचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. अशातच या व्हिडीओने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण लावणी सादर करताना दिसत आहे. ‘विचार काय आहे तुमचा’या लोकप्रिय लावणी गाण्यावर हा तरुण डान्स करत आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की व्यासपीठावर पाहूणे मंडळी बसलेले दिसत आहे आणि त्याच्या अवतीभोवती खूर्चीवर बसून अनेक जण या तरुणाची लावणी बघत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सर्व जण या तरुणाच्या लावणीचा मनसोक्त आनंद घेताना दिसत आहे.

हेही वाचा : “बायकोसमोर सोनं आहे लोखंड..” नवऱ्याचा भन्नाट उखाणा अन् नवरी लाजली, VIDEO होतोय व्हायरल

पाहा व्हायरल व्हिडीओ

rajdancer2021 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आमचे चौदा वर्षानंतर गेट टूगेदर झाल. तिथे मी लावणी सादर केली तर माझी लावणी पाहून आमचे शिक्षक पण लाजले खरंच मला खूप आनंद वाटतो की मला माझा गुरूंच्या समोर लावणी करण्याची संधी भेटली”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आपली कला दाखवून दुसऱ्यांना खुश केले. खूप खूप छान.” तर एका युजरने लिहिलेय, “अरे दादा कसला भारी डान्स करतो. मी हा डान्स १०० वेळा पेक्षा जास्त पाहिला” आणखी एका युजरने लिहिलेय, “गौतमी पाटील तुमच्यापुढे फेल आहे” अनेक युजर्सना या तरुणाची लावणी आवडली. अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

कोण आहे हा तरुण?

हा तरुण एक उत्तम डान्सर आहे. त्याला सर्व राज डान्सर म्हणून ओळखतात. तो सोशल मीडियावर लावणीचे व्हिडीओ शेअर करत असतो. इन्स्टाग्रामवर त्याचे लाखो फॉलोवर्स आहेत. त्याच्या व्हिडीओवर लोक लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.