भारत हा विविध संस्कृतीने नटलेला देश आहे. आपल्या देशामध्ये अनेक नृत्य प्रकारही आहे. सोशल मीडियावर अशा विविध नृत्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्याने जोगवा नृत्य सादर केले आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तरुणाने इतके अप्रतिम नृत्य सादर केले आहे की पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा येत आहे. विशेष म्हणजे तरुणाने चक्क साडी नेसून नृत्य सादर केले आहे.

हेही वाचा – फक्त K-Drama पाहिला म्हणून १६ वर्षांच्या मुलांना मिळाली शिक्षा! १२ वर्ष करावे लागेल ‘हे’ काम

इंस्टाग्रामवर amhigoraikar092 आणि sankett_44 नावाच्या अकाउंटवर व्हायरल व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये तरुणीने जोगवा चित्रपटातील लल्लाती भंडार गाण्यावर नृत्य सादर केले आहे. तरुणीने अत्यंत उत्साहाने नृत्य सादर केले आहे. नृत्य पाहून लोक थक्क झाले आहेत. लोकांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. व्हिडीओ जुना असून सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे. लोक तरुणाच्या उत्साह आणि नृत्याचे कौतूक करत आहे.

व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एकाने व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की, “जर मी प्रेक्षकांमध्ये असते तर मी तुम्हाला नक्की प्रोत्साहन दिले असते! तुम्ही खूप चांगले नृत्य सादर केले व्वा!” दुसऱ्याने लिहिले की, “आत्मविश्वास जबरदस्त आहे.” एकाने बालपणीच्या आठवणींना उजाळा देत म्हटले की, “आम्ही सातवीमध्ये असताना या गाण्यावर डान्स घेतला होता. आम्हाला तुझ्यासारखा नाही जमला आम्हाला … अप्रतिम डान्स करतो तू.”

हेही वाचा –थंडीपासून वाचण्यासाठी हटके जुगाड! सायकलच्या सीटमध्ये टाकले जळत्या लाकडाचे तुकडे; Video एकदा बघाच…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जोगवा हा मराठी चित्रपट आहे ज्याला २००९ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटामध्ये अभिनेता उपेंद्र लिमये, अभिनेत्री मुक्ता बर्वे यांच्या प्रमुख भुमिका साकारली होती. यासह प्रिया बेर्डे, विनय आपटे आणि किशोर कदम हे देखील मुख्य भुमिकेत दिसले. चित्रपट कर्नाटकातील यल्लमा देवीला मुले-मुली सोडण्याच्या अनिष्ट रुढी परंपरांवर आधारित आहे. या मुलांना जोगता आणि मुलींना जोगतीण असे म्हणतात. चित्रपटाने सर्वांचे मन जिंकले होते. या चित्रपटात ज्याप्रमाणे अभिनेता उपेंद्र लिमये यांनी साकारलेल्या अप्रतिम भुमिकेची होती त्याची आठवण करून देणारे तरुणाचे हे नृत्य आहे.