संपूर्ण भारतामध्ये सध्या थंडीची लाट पसरली आहेय. कडक्याच्या थंडी लोकांना सहन होत नाहीये. थंडी पासून सुटका मिळवण्यासाठी लोक स्वेटर टोपी घालून फिरताना दिसत आहे. शेकोटी पेटवून थंडीचा सामना करताना दिसत आहे. थंडी पासून वाचण्यासाठी लोक एका पेक्षा एक हटके जुगाड शोधून काढत आहे. अशाच थंडीपासून वाचण्यासाठी एक हटके जुगाड समोर आला आहे. लोकांना हा जुगाड पाहून धक्का बसला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक व्यक्ती थंडीपासून वाटण्यासाठी असा जुगाड शोधला आहे ज्याचा कोणी स्वप्नातीह विचार केला नसेल.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, व्यक्तीने सायकलवर एक विचित्र सीट लावले आहे. सायकलचे सीट लोखंडी असल्याचे स्पष्ट दिसते. पण या सीटला एक बॉक्स आहे जो बाहेर काढता येतो. या व्यक्तीने सीटच्या बॉक्समध्ये लहान लाकडांचे तुकडे करून पेटवल्याचे दिसते आणि ते जळत्या लाकडाचे तुकडे सायकलच्या सीटमध्ये टाकले आहे आणि तो बॉक्स बंद केला. सीट गरम राहण्यासाठी व्यक्तीने हा जुगाड केला आहे. एवढंच नाही तर त्या गरम झालेल्या सीटवर बसून तो सायकलही चालवत आहे.

thief ATM Kalyan, ATM Kalyan,
तब्बल ९२ एटीएम कार्डद्वारे डल्ला मारणाऱ्या चोराला कल्याणमध्ये अटक, आधीच १६ गुन्हे दाखल असल्याचंही उघड
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Techie doubles his income
वर्षाला १ कोटी रुपये कमावण्यासाठी व्यक्तीने शोधला जुगाड, लाखोंचे शैक्षणिक कर्जही फेडलं, एकाच वेळी केल्या….
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

हेही वाचा – वर्दीतल्या माणुसकीला सलाम! पोलिस कर्मचाऱ्याच्या ‘त्या’ कृतीने जिंकले नेटकऱ्यांचे मन! Viral Video एकदा पाहाच!

jहेही वाचा – फक्त K-Drama पाहिला म्हणून १६ वर्षांच्या मुलांना मिळाली शिक्षा! १२ वर्ष करावे लागेल ‘हे’ काम

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर bigpannda नावाच्या अकांऊटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ७ लाखांहून अधिक वेळा लाईक करण्यात आले आहे. या व्हिडिओवर अनेकजण मजेशीर कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले, थंडीत सायकलस्वारासाठी अनोखी भेट, दुसऱ्या यूजरने लिहिले, “हा काय मूर्खपणा आहे.” तर एकाने लिहिले, “ही कल्पना कोणाची होती?” हा व्हिडीओ नक्की कुठलाआहे याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.