Viral Video : सोशल मीडियावर दरदिवशी अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. कधी कोणी डान्स करताना दिसतो, तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतो. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण स्टेजवर कविता सादर करताना दिसतो. तो त्याच्या प्रेयसीसाठी अप्रतिम अशी मजेशीर कविता सादर करतो. ही कविता ऐकून कोणीही थक्क होईल.

हा व्हायरल व्हिडीओ सिंहगड कॉलेज ऑफ नर्सिंग नऱ्हे येथील असून, या कॉलेजच्या एका कार्यक्रमात एक विद्यार्थी स्टेजवर कविता सादर करताना दिसत आहे. तो त्याच्या प्रेयसीसाठी अतिशय मजेशीर व सुंदर कविता सादर करतो.

तो म्हणतो, “कृपया शब्दांवरती लक्ष असू द्या

तू सुंदर सुबक आरसा आहे
मी काचे मागचा पारा गं

तू स्मितहास्य आणणाऱ्या आठवणी प्रिये
मी भलता गोंधळ पसारा गं

तु मुक्त खळखळणारा समुद्र आहेस,
मी स्तब्ध त्रासलेला किनारा गं

तू हवीहवीशी झुळूक प्रिये
मी तुफान नकोसा वारा गं

तू पिकलेल्या फणसाचा गर आहेस
मी तुटून पडलेला पारा गं

तू पंचपक्वनाचं ताट प्रिये
मी शिळ्या भाकरीचा काला गं

तू प्रॉपर फ्यूचर प्लॅनिंग आहेस
मी रेखावरचं नशीब गं
तु वेळेआधी पोहोचणार झुळक प्रिये
मी नेहमी पाच मिनिटे उशीर गं

तू मधुर सुरमई कोकीळ आहेस,
मी गोंगाट कर्कश आवाज गं

तू सलग कविता आवडणारी
मी मध्येच घेतलेला पॉज गं

तू शांत रमलेली संध्याकाळ आहेस
मी भर उन्हाचा त्रास गं

तु रिमझिम पडणारी बरसात प्रिये
मी हवामान खात्याचा अंदाज गं

तु अत्तराचा सुंगध आहेस
मी उगाच श्वासांना त्रास गं

तू वर्गामधली टॉपर प्रिये
मी दोन विषयात बॅक गं”

या तरुणाच्या प्रत्येक ओळीवर विद्यार्थी जोर जोराने टाळ्या वाजवताना दिसत आहे. ही कविता ऐकून कोणीही थक्क थक्क होईल.

पाहा व्हायरल व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Dhammapal Khillare (@deep_03_____)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

deep_03_____ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तू रिमझिम पडणारी बरसात प्रिये, मी हवामान खात्याचा अंदाज गं.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “जोरदार” तर एका युजरने लिहिलेय, “नारायण पुरी यांच्या प्रेमाचा झांगडगुत्ता कवितेची आठवण झाली” तर एका युजरने लिहिलेय, “वा दादा” आणखी एका युजरने लिहिलेय, “अप्रतिम भाऊ खूपच भारी शब्द आहेत” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.