तुम्ही कधी ना कधी सायकल चालवली असेल किंवा कोणाला सायकल चालवताना पाहिले असेलच. एखाद्या लहान मुलाला हँडल आणि सीटच्यामध्ये पाईप जोडलेली जुन्या प्रकारची सायकल चालवताना तुम्ही पाहिले आहे का? अशा सायकलवर थेट बसता येत नाही, पँडलवर एक पाय ठेवून, सायकल एका पाय जमिनीवर घासत पुढे जावे लागते जेणेकरून सायकलला गती येईल आणि मग पटकन सायकलच्या दुसऱ्या बाजूला उभे राहून पाय टाकावा लागतो त्यानंतर सीटवरबसून सायकल चालवता येते. उतरताना अंदाज घेऊन पाय टेकवत सायकल थांबवावी लागते. ही समस्या विशेष:ता उंचीने लहान असलेल्याने जास्त येतो पण तुम्ही अगदी अशाच प्रकारे कोणाला बाइक चालवताना पाहिले आहे का? नसेल तर हा मजेशीर व्हिडीओ पाहा.

सध्या सोशल मीडियावर एक तरुणी सायकल चालवतात त्याप्रमाणे बाइक चालवताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुणी बाईक चालवताना दिसत आहे. जसा सिग्नल जवळ येतो तशी ती ब्रेक मारून गाडी पायावर बॅलन्स करण्याऐवजी, तरुणी गाडीवरून उतरते आणि रस्त्यावर बाइक पकडून उभी राहते. तिची उंची कमी असल्यामुळे तिचे पाय जमिनीवर टेकत नाही म्हणून तरुणीने हा जुगाड शोधला आहे. एवढंच नाही तर पुन्हा बाइक सुरु करताही ती गाडीच्या स्टँडवर एक पाय ठेवते आणि दुसऱ्या पाय जमिनीवर घासत बाईक पुढे ढकलते आणि पटकन बाइकवर बसते. व्हायरल व्हिडीओ पाहून लोक थक्क झाले आहेत. हा व्हिडीओ पाहून लोकांना हसू आवरता येईना

हेही वाचा – “देणाऱ्याने देत जावे…,” भुकेल्या हत्तींना शेतकऱ्याने खायला दिला ऊस; ह्रदयस्पर्शी व्हिडीओ पाहा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंस्टाग्रामवर melbuoz_ नावाच्या अकांउटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडोओ पाहून लोक तरुणीचे कौतूक करत आहेत. एकाने म्हटले की, “उंची असूनही ८० टक्के बाईकर्स हे करू शकत नाही …शाब्बास मुली” दुसऱ्याने म्हटले, तिला हवे तसे आयुष्य जगण्यापासून कोणीही रोखू शकत नाही”