Cycle garaba video: अनेक ठिकाणी विविध लोकनृत्य, संगीत, खेळ खेळले जातात. याबबतीत गुजरात खूपच लोकप्रिय आहे, कारण इथे सर्वच आनंदोत्सवात आणि मोठ्या प्रमाणात पारंपारीक वेशभुषा करून गरबा दांडीया खेळतात. पण यंदा गुजरातमध्ये अनोखा गरबा बघायला मिळाला. अनोखा म्हणजे थेट सायकलवर. हो गुजरातमध्ये काही तरुण आणि तरुणींनी चक्क सायकल चालवत चालवत गरबा खेळलाय. कसा? चला पाहुयात व्हिडीओमधून. या अनोख्या गरब्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

सुरत जिल्हा क्रिकेट असोसिएशनने या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या नृत्याला “सायकल गरबा” म्हणतात, सायकल गरबामध्ये लोक सायकल चालवत हातात दांडीया घेऊन गरबा खेळताना दिसत आहेत. त्याच्या या आगळ्या वेगळ्या प्रकारामुळे याचा व्हिडीओ व्हायरल झाला. हा प्रकार पहिल्यांदाच पाहायला मिळाला आहे, त्यामुळे अनेकजण हा गरबा पाण्यासाठी उत्सुक आहेत.

सायकल गरब्यात सर्व वयोगटातील लोक सहभागी झाले होते. प्रत्येकजण वर्तुळात सायकल चालवत गरबा खेळताना दिसत होता.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: स्मार्ट बायको! डोळ्यांवर पट्टी बांधून पतीला ओळखण्याची स्पर्धा; पत्नीनं लढवली अशी शक्कल की सारे पहातच राहिले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गरबा हे गुजरातचे पारंपारिक लोकनृत्य आहे, शारदीय नवरात्रात गरबा नृत्यात मध्यभागी घडा ठेवला जातो. या मातीच्या घड्याला छिद्रे पाडली जातात आणि त्यामध्ये दिवा प्रज्वलित केला जातो. या घड्याभोवती महिला, मुली फेर धरतात आणि देवीची गीते म्हणून पारंपरिक नृत्य करतात.