अमेरिकेतील एका पोलीस अधिकाऱ्याला महिलेला किस करुन तिला आपल्या पथकाच्या कारमध्ये बसवणं महागात पडलं आहे. या पोलीस अधिकाऱ्याने महिलेला किस केल्याचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. महिलेला भररस्त्यात किस करुन तिला पोलीस कारमध्ये बसवणाऱ्या पोलिसाचे नाव फ्रान्सिस्को मार्लेट असं आहे. तो अमेरिकेतील प्रिन्स जॉर्ज काउंटीमध्ये पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होता. सध्या याप्रकरणाची पुढील कारवाई सुरू आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये फ्रान्सिस्को मार्लेट एका पार्कजवळ कारच्या समोर उभा असल्याचं दिसत आहे. यावेळी कारजवळ एका महिला येते, जिला तो मिठी मारतो आणि किस करायला सुरुवात करतो. एवढ्यावरच हे प्रकरण संपत नाही. तर महिला पोलीस अधिकाऱ्याचा हात पकडून त्याला कारच्या मागच्या सीटकडे घेऊन जाते आणि ती आतमध्ये बसते. यावेळी मार्लेट कारच्या बाहेर उभा राहून तिला पुन्हा किस करायला सुरुवात करताना दिसत आहे.

व्हिडीओ पाहताच संतापले नेटकरी –

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. कारण हा पोलीस भररस्त्यात महिलेला किस करताना तिथे अनेक लहान मुलं होती, त्यामुळे असं करणं अयोग्य असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. तसेच सरकारी वाहनामध्ये असं कृत्य करणंही चुकीचं असल्याचं लोकं म्हणत आहे. दरम्यान, या पोलीस अधिकाऱ्याला सध्या निलंबित केलं आहे. शिवाय तपास पूर्ण झाल्यावर आम्ही या प्रकरणा संबंधित अधिकची माहिती देऊ असं पोलिसांनी सांगितलं आहे. तसेच अशी घटना पहिल्यांदाच झालेली नसून पोलिसाने कारमध्ये महिलांना बसवल्याचं इतर व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये पोलिसाने हे कृत्य अनेकदा केल्याचा दावा केला जात आहे.

फ्रान्सिस्को मार्लेटवर पूर्वीही झाले आहेत आरोप –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणी विभागाने मंगळवारी एक ट्विट करत संबंधित अधिकाऱ्याविरोधात चौकशी सुरू असून सध्या त्याला निलंबित केल्याची माहिती दिली. धक्कादायक बाब म्हणजे या पोलीस अधिकाऱ्यावर असे आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही २०१६ मध्ये, मार्लेटला त्याच्या माजी मैत्रिणीच्या मुलाला कथितपणे मारहाण केल्यावर बाल शोषण केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले होते. एवढेच नाही तर घरगुती हिंसाचाराचा आरोप झाल्यानंतर मे महिन्यात त्याला एका महिन्यासाठी निलंबित करण्यात आले होते.