आजकाल प्रत्येक जोडप्याला आपलं लग्न इतरांपेक्षा खास आणि हटके व्हावं असं वाटतं. यासाठी ते नवनवीन आयडीया शोधत असतात. शिवाय सोशल मीडियावर लग्ना संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये कोणी उडत्या विमानात लग्न करतं तर कोणी डोंगराळ भागात अशा अनोख्या लग्नांचे व्हिडीओ तुम्ही या आधीही सोशल मीडियावर पाहिले असतील. कारण आजकाल अनेक जोडपी पारंपारिक पद्धतीने लग्न न करता काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. सध्या अशाच एका अनोख्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. कारण या लग्नानंतर वधू-वरांसह वऱ्हाडाने असं काही केलं आहे, जे पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.

नवर-बायकोसह वऱ्हाडाने मारली हवेत उडी –

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये जोडप्याने केवळ स्वतःसाठीच नव्हे तर लग्नातील पाहुण्यांसाठी देखील असा लग्नाचं साहसी सेलिब्रेशन केलं आहे. जे कदाचित ते कधीच विसरणार नाहीत. कारण हा विवाह सोहळा पार पडताच नवर-बायकोसह वऱ्हाडानेदेखील उंच कड्यावरुन हवेत उड्या मारल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये लग्नातील पाहुण्यांसोबत वधू-वर उंच कड्यावरून स्कायडायव्हिंग करताना आणि मजेदार साहसाचा आनंद घेताना दिसत आहेत. विशेषत:, प्रिसिला अँट आणि फिलिपो लेकर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जोडप्याने कड्यावरुन लग्न केले आणि नंतर नवीन सुरुवात साजरी करण्यासाठी सर्व वऱ्हाडाबरोबर हवेत उडी घेतली. महत्वाचं म्हणजे लग्नाला उपस्थित सर्व लोक आवश्यक सुरक्षा उपकरणे घेऊन आल्याचंही दिसत आहे.

हेही पाहा- रीलसाठी कायपण! पंपावर चक्क पेट्रोलनेच बाईक धुवायला सुरुवात केली अन्…, व्हायरल Video पाहून डोकंच धराल

हा व्हिडीओ @lalibretamorada नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “आम्ही उडी मारतो परंतु त्यांच्याबरोबर ज्यांनी आमचा हाथ पकडलेला आहे, ती उडी जी आम्हाला आठवण करुन देते की भितीच्या पलीकडे जीवन आहे. प्रिसिला आणि फिलिपोचे लग्न.” हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोक तो पाहून आश्चर्यचकीत झाले आहेत. तर काही लोक या जोडप्याच्या निर्भयतेचे आणि धैर्याचे कौतुक करत आहेत. मात्र, काही लोकांनी अतिउत्साह प्राणघातक ठरू शकतो असं म्हटलं आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –

एक नेटकऱ्याने लिहिलं, “अरे यार! मला हे खूप आवडते. मी माझ्या लग्नात हे नक्कीच करणार आहे पण मला खूप भीती वाटते, नवविवाहित जोडप्याचे अभिनंदन, त्यांना उदंड आयुष्य लाभो या शुभेच्छा.” दुसर्‍याने लिहिलं, “व्हिडिओ पाहून मला भीती वाटली! पण ते काहीही असले तरी ते अप्रतिम आहे.”