ISKCON Devotees Chant ‘Hare Krishna’ Outside KFC : लंडनमधील इस्कॉनच्या गोविंदा या शाकाहारी रेस्टॉरंटमध्ये एक ब्रिटिश कंटेंट क्रिएटर केएफसी चिकन खात असल्याचा धक्कादायक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात होता. या घटनेच्या काही दिवसांनी, एक्सवरील एका व्हिडिओमध्ये धार्मिक संस्थेचे भक्त केएफसी आउटलेटबाहेर “हरे कृष्ण” असा जप करताना दिसत आहेत.

‘सेन्झो’ या युट्यूबरने केलेल्या कृतीबद्दल माफी मागितली आहे, तर एक्स युजर @bhaktSenapati ने न्यू यॉर्कमधील एका KFC आउटलेटबाहेर इस्कॉन भक्तांचा निषेध करणारा व्हिडिओ ऑनलाइन पोस्ट केला आहे. पोस्टमध्ये लिहिले आहे की, “ते आम्हाला त्रास द्यायला येतात, पण आम्ही त्यांना चांगलं विचार करायला लावण्यासाठी येतो. हरे कृष्णा.”

इस्कॉनच्या शाकाहारी रेस्टॉरंटमध्ये युट्यूबरने खाल्ले KFC चिकन

‘सेन्झो’ या युट्यूबरने इस्कॉन चालवणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये प्रवेश केल्यानंतर आणि विनोद म्हणून रेकॉर्डिंग करताना केएफसीचे चिकन खाल्ल्यानंतर वाद सुरू झाला. इशारा दिल्यानंतरही त्या व्यक्तीने कर्मचाऱ्यांना टोमणे मारल्याचा आरोप आहे, इस्कॉन समुदायाच्या आध्यात्मिक आणि आहारविषयक नियमांना आक्षेपार्ह म्हणून या कृत्याचा ऑनलाइन मोठ्या प्रमाणात निषेध करण्यात आला.

इस्कॉनच्या भक्तांनी व्यक्त केली नाराजी

युट्यूबरने मागितली माफी

या वादग्रस्त घटनेनंतर, युट्यूबरने जाहीर माफी मागितली आणि म्हटले की, “जर मला माहित असते की रेस्टॉरंट मंदिराच्या ठिकाणी आहे, तर मी कधीही तो विनोद चित्रित केला नसता आणि निघून गेलो नसतो. मी नियम ओलांडून हिंदू समुदायाशी संबंधित असलेल्या एका व्हेगन रेस्टॉरंटमध्ये चिकन खाण्यास सुरुवात केली. माझे कृत्य अविचारी आणि बेजबाबदार होते.”

इस्कानच्या भक्तांची प्रतिक्रयेवर काय म्हणाले नेटकरी

@bhaktSenapatiच्या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी प्रतिसाद दिला आणि काहींनी पाठिंबा दर्शवला, तर काहींनी निषेधाच्या स्वरूपाची टीका केली. एका वापरकर्त्याने लिहिले, “निषेध करण्याचा हा किती छान मार्ग आहे. जरी केएफसीने थेट ते कृत्य केले नाही, तरी एका वेड्या ग्राहकाने केले. पण संदेश पोहोचवला.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्याने म्हटले, “नकारात्मक लोकांना गुंतवून ठेवण्याचा आणि सकारात्मक प्रभाव पाडण्याचा उत्तम मार्ग.” तिसऱ्याने लिहिले, “केएफसीची चूक नव्हती, केएफसीमधून ऑर्डर देणारी व्यक्तीची चूक होती.”