Ahmedabad Plane Crash Fact Check Video : गुजरातच्या अहमदाबादमध्ये १२ जून २०२५ रोजी झालेल्या विमान अपघाताने संपूर्ण देश हादरून गेला आहे. अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे बोइंग ७८७-८ ड्रीमलायनर (फ्लाइट AI171) उड्डाण घेतल्यानंतर थोड्याच वेळात कोसळले. या अपघातातच २४१ हून अधिक लोकांना आपला जीव गमवाला लागला, तर अनेक लोक जखमी झालेत. अहमदाबाद विमान अपघातानंतर अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. यात आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो विमान अपघातापूर्वीचा फेसबुक लाइव्ह व्हिडीओ असल्याचा दावा केला जात आहे, ज्यात अपघातापूर्वीचे शेवटचे क्षण कैद केल्याचा दावाही केला जातोय. त्यामुळे आम्ही या व्हिडीओची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा एक वेगळं सत्य समोरं आलं ते जाणून घेऊ…

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर दीपक शर्मा यांनी हा व्हिडीओ खोट्या दाव्यासह पोस्ट केला.

अर्काइव्ह व्हर्जन: https://archive.ph/AZTMS

इतर युजर्सदेखील हाच व्हिडीओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही हा व्हिडीओ InVid टूलमध्ये अपलोड केला आणि त्यातून मिळालेल्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च केले.

यावेळी आम्हाला १६ जानेवारी २०२३ रोजी dailyrecord.co.uk वर पोस्ट केलेली एक बातमी आढळून आली.

https://www.dailyrecord.co.uk/news/uk-world-news/chilling-final-moments-passengers-who-28964928

आम्हाला या संदर्भात इतरही अशा अनेक बातम्या सापडल्या.

https://www.livegore.com/483325/final-moments-before-deadly-nepal-plane-crash
https://www.scoopwhoop.com/entertainment/nepal-plane-crash-indian-passenger-recorded-last-moments

या बातम्यांमध्ये म्हटले आहे की : सोनू जयस्वाल आपल्या मित्रांच्या ग्रुपसह यती एअरलाइन्सच्या विमानातून पोखरा येथे जात होते. यावेळी ते फेसबुक लाइव्ह करून विमानाबाहेर आणि आतील दृश्य दाखवत होते. हे विमान कोसळण्यापूर्वी आणि आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापूर्वी काही मिनिटे आधी त्यांनी हे फेसबुक लाइव्ह सुरू केले होते, याच लाइव्हमध्ये विमान दुर्घटनेचे दृश्य कैद झाले, या दुर्घटनेत ६८ लोकांचा मृत्यू झाला.

आम्हाला १६ जानेवारी २०२३ रोजी हिंदुस्तान टाइम्सने त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट केलेला व्हिडीओ सापडला.

कॅप्शनमध्ये म्हटले होते : सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात सोनू जयस्वाल (प्रवासी) कथितपणे ATR 72 मध्ये फेसबुक लाइव्ह शूट करताना दिसत आहे. फेसबुक लाइव्हदरम्यानच विमान कोसळले. कुटुंबाने त्याच्या मृत्यूची पुष्टी केली. यापूर्वी अपघातात किमान ६८ लोक मरण पावल्याचे वृत्त होते, परंतु आता मृतांचा आकडा ६६ वर पोहोचला आहे.

निष्कर्ष :

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एअर इंडियाचे विमान अपघातापूर्वीचे शेवटचे क्षण दाखवत असल्याचा दावा करणारा व्हायरल व्हिडीओ, प्रत्यक्षात जानेवारी २०२३ च्या मध्ये नेपाळच्या यती एअरलाइन्सच्या विमानात एका प्रवाशाने काढलेला फेसबुक लाइव्ह व्हिडीओ आहे, त्यामुळे व्हायरल दावा खोटा आहे.