Air India Plane Safe Landing: विमानातील शेकडो प्रवाशांचे प्राण धोक्यात, बाहेर पावसाचा कहर आणि आत धडधडत्या हृदयांचे ठोके. अशा परिस्थितीत एका पायलटने दाखवलेली शांती आणि कौशल्य… खरंच प्रवाशांना नवजीवन देऊन गेलं. हा क्षण पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘हा खरा आकाशातील हिरो!’ मुंबई विमानतळावर धोक्याचे सावट दाटलेलं… कमी दृश्यमानता, वाऱ्यांचा जोर आणि लँडिंगला आलेलं विमान. नेमकं पुढे काय झालं हे जाणून घेतल्याशिवाय तुम्ही व्हिडीओवरून नजरच हटवू शकणार नाही.

मुंबईमध्ये सध्या पावसाने थैमान घातलं आहे. मुसळधार पावसासोबतच जोरदार वारा, सर्वत्र पाणी साठल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशा बिकट हवामानात विमान लँडिंग म्हणजे एक प्रकारे प्राणांतिक धोक्याला आमंत्रणच. पण, एअर इंडियाच्या एका पायलटने दाखवलेली विवेकबुद्धी पाहून सोशल मीडियावर सगळीकडे त्याचं कौतुक सुरू आहे.

एअर इंडिया VT–TNC विमानाचे कॅप्टन नीरज सेठी यांनी मुसळधार पावसाच्या तडाख्यात विमानाची सुरक्षित लँडिंग घडवून आणली. हा व्हिडीओ पाहून लोक थक्क झाले आहेत. काही क्षणात मोठं संकट घडू शकलं असतं, पण पायलटच्या शांततेने आणि चपळाईने ते टळलं.

विशेष म्हणजे, याच वर्षी अहमदाबादच्या सरदार पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला मोठा अपघात झाला होता. त्या दुर्घटनेत तब्बल २४० हून अधिक प्रवासी आणि क्रू मेंबर्सनी आपले प्राण गमावले होते. त्या घटनेने देशभर नव्हे तर संपूर्ण जग हादरलं होतं. त्यानंतर वारंवार तांत्रिक कारणांमुळे फ्लाइट रद्द होण्याच्या बातम्या समोर आल्या, त्यामुळे लोकांमध्ये विमान प्रवासाबाबत भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

पण, आता मुंबईतून समोर आलेल्या या व्हिडीओने पुन्हा एकदा लोकांचा आत्मविश्वास वाढवला आहे. ट्विटरवर (आता X) @vidaysagarjagadeesan या हँडलवर हा थरारक व्हिडीओ शेअर करण्यात आला. त्यात लिहिलंय, “मुंबईच्या मुसळधार पावसात कॅप्टन नीरज सेठी यांनी दाखवलेली समजुतदारी पाहून त्यांना सलाम, एअर इंडिया VT–TNC.”

हा व्हिडीओ १९ ऑगस्ट रोजी शेअर करण्यात आला असून, आत्तापर्यंत याला एक लाखांहून अधिक व्ह्युज आणि दोन हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. लोक कमेंट्समध्ये सतत पायलटचं कौतुक करत आहेत. “खऱ्या अर्थाने आकाशातील हिरो”, “या पायलटला सलाम”, “प्रवाशांचे प्राण वाचवले”, अशा प्रतिक्रिया सतत येत आहेत.

मुंबईत हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला होता. रस्ते पाण्याखाली, वाहतूक विस्कळीत आणि जनजीवन ठप्प झालेलं असताना पायलटने केलेली ही लँडिंग म्हणजे खरंच एक थरारक पराक्रमच.

येथे पाहा व्हिडीओ

लोक आता एकच म्हणतायत – “शेवटी खरा हिरो सिनेमात नसतो, आकाशात उडणाऱ्या विमानाचा कॅप्टनच असतो!”